ईश्वर पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून सरपंचपदाची थेट मतदारांमधून निवडणूक होणार असल्याने उत्सुकता वाढली आहे. स्थानिक राजकीय नेत्यांनी निवडणुकीसाठी व्यूहरचना सुरू केली आहे. आठ ग्रा.पं.मध्ये म्हसावद, पाडळदा व कळंबू या मोठय़ा ग्रामपंचायतींचा समावेश असून तेथील निवडणुकीत प्रतिष्ठेच्या लढती होणार आहेत.राज्य शासनाने नगरपालिका व महानगरपालिकांच्या नगराध्यक्ष व महापौर पदाची निवडणूक थेट घेण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही कायम ठेवून सरपंचपदाची निवड थेट मतदारांमधून होणार आहे. शहादा तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने सर्वच राजकीय पक्षांचे स्थानिक नेते व कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. लोकनियुक्त सरपंचपदाचा पहिला मान आपल्याला मिळावा म्हणून इच्छुकांनी गावपातळीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. थेट मतदारांमधून सरपंचांची निवड होणार असल्याने सक्षम व निवडून येणा:या उमेदवारच्या शोधात राजकीय पक्ष व पॅनल प्रमुख आहेत. या पदासाठी सुशिक्षित, स्थानिक व गावातील समस्यांची जाण असलेला, लोकांची कामे करणारा व गावाचा विकास करणारा उमेदवार आवश्यक आहे. अशा उमेदवाराच्या शोधात सर्वजण आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत राजकीय पक्षाचे ङोंडे बाजूला सारून स्थानिक संबंधांवर निवडणूक लढवली जाते. या निवडणुकांमध्ये सत्ताधारी व विरोधक कोण कोणाकडे असतो हे समीकरण लावणे अवघड ठरते. त्यामुळे उमेदवारांचे स्थानिक स्तरावर लोकांशी कसे संबंध आहेत यावर निवडणूक जिंकणे अवलंबून असते.
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी हालचाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 12:21 PM