नंदुरबार : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना घर बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पालिकेतर्फे ही योजना राबविण्यात येणार असून त्यासाठी पालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेणार आहेत.पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सर्वांसाठी घरे या योजनेत ज्यांना घरे नाहीत अशा आर्थिक दुर्बल घटकांना व अल्प उत्पन्न असणाºया लाभार्थ्यांना सहभागी होता येईल. या योजनेंतर्गत लाभधारकास बांधकामासाठी अनुदान केंद्र व राज्य शासनाकडून उपलब्ध होणार आहे. या योजनेत तीन लाखापर्यंत उत्पन्न असणाºयास ३०.० चौरस मीटर (३२२.०० चौरस फूट) क्षेत्रफळाचे घर मिळेल तर सहा लाखापर्यंत उत्पन्न असणाºयास ६०.० चौरस मीटर (६४४.०० चौरस फूट) क्षेत्र फळाचे घर मिळेल.ही योजना नगरपरिषद राबविणार असून, सहभागी होण्यासाठी नगरपरिषदेकडील प्रतिनिधी आपणाकडे आवेदन पत्र भरुन घेण्यासाठी येतील. त्यांना आवश्यक ती खालील कागदपत्रे द्यावीत. त्यात कुटुंबातील सदस्यांचे आधारकार्ड, नगरपालिकेचे भरत असलेल्या कराच्या अद्यावत पावत्या, घराचे लाईटबिल, बँक पास बुक झेरॉक्स, स्व प्रमाणित उत्पन्नाचा दाखला, पुरुष व स्त्री यांच्या पासपोर्ट साईज फोटो, २०११ च्या जनगणनेनुसार यादीत लाभधारकाचे नाव असल्याचा अथवा रहिवासी असल्याचा दाखला, इत्यादींची झेरॉक्स प्रत द्यावी व आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे. स्वमालकीचे घर नसल्याचे प्रतिज्ञापत्र उपलब्ध करून द्यावयाचे आहे. योजनेचे फॉर्मस सोबत स्वयंघोषणापत्र व प्रतिज्ञापत्राची प्रत जोडलेली आहेत. या योजनेचे औपचारिक फॉर्म वाटप नुकतेच आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, मुख्याधिकारी गणेश गिरी यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
अल्प उत्पन्न कुटुंबांना अनुदान देणार
By admin | Published: January 04, 2017 10:56 PM