लोकमत ऑनलाईनशहादा, दि़ 9 : हरभरा व गव्हाची शासनाच्या हमी भावापेक्षा कमी किमतीत खरेदी होत असल्याच्या निषेधार्थ स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या शहादा बंदला सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ अवघ्या आठवडय़ाभरात दुस:यांदा शहादा बाजापेठ बंद झाल्याने सामान्य नागरिक आणि व्यापा:यांकडून नाराजी व्यक्त होत आह़ेशहादा बाजार समितीत व्यापा:यांकडून शासनाच्या हमी भावाप्रमाणे हरभरा आणि गव्हाची खरेदी होत नसल्याचा आरोप करीत स्वाभीमानी संघटनेने गेल्या तीन दिवसांपासून शहादा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आह़े शिवाय बाजार समितीतही तीन दिवसांपासून कामकाज ठप्प झाले आहेत़ दरम्यान, सोमवार म्हणजे आठवडय़ाचा पहिला दिवस असतो़ त्यामुळे या दिवशी मोठय़ा प्रमाणात बाजारपेठेत उलाढाल होत असत़े परंतु बंदमुळे व्यापारी तसेच ग्रामीण भागातून आलेल्या ग्रामस्थांचे मोठय़ा प्रमाणात हाल होताना दिसून आल़े अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पुकारण्यात आला होता़ यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता़
हरभरा, गहुच्या हमीभावासाठी शहाद्यात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 11:44 AM