ऑनलाइन लोकमतअक्कलकुवा, नंदुरबार, दि. 31 - तळोदा मेवासी वनक्षेत्रात 2017-18 या वर्षात शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत 35 लाख झाडांचे रोपण करण्यात येणार आह़े या 35 लाख झाडांद्वारे सातपुडा हरित करण्याचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आह़े मेवासी वनविभाग तळोदा यांच्या क्षेत्रातील आठ विभागात या वृक्षांचे रोपण करण्यासाठी तयारी सुरू असून अक्कलकुवा आणि तळोदा येथील रोपवाटिकांमध्ये रोपे तयार करण्याच्या कामांना वेग आला आह़े येत्या 2 जुलैपासून लागवडीला सुरूवात होणार असल्याने वनविभागाकडून जय्यत तयारी करण्यात येत आह़े सातपुडय़ाच्या साधारण 59 हजार हेक्टर क्षेत्रात या वृक्षांची लागवड करण्याचे उद्दीष्ट वनविभागाचे असून यासाठी तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायती, सेवाभावी संस्था, वनसमित्या यांची मदत घेण्यात येणार असल्याचे वनविभागाच्यावतीने कळवण्यात आले आह़े याबाबत तळोदा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक पाटील यांच्याकडून माहिती घेतली असता, त्यांनी सांगितले की, तळोदा येथील रोपवाटिकेत 9 लाख पाच हजार झाडांची निर्मिती करण्यात येत आह़े यातून सात लाख 65 हजार झाडे आज लागवड योग्य स्थितीत आहेत़ दोन लाख 16 हजार झाडे वनविभाग विविध संस्था, शाळा यांना देणार आह़े यामुळे यंदा वृक्ष लागवडीची चळवळ हे अधिक बळकट होऊन हरित सातपुडा ही संकल्पना प्रत्यक्षात आकारास येणार आह़े मेवासी वनक्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी हे वृक्ष लागवड आणि रोपे तयार करण्याच्या कामांकडे बारकाईने लक्ष देत असल्याने कामे सुरळीत सुरू आहेत़ यंदापासून पेसांतर्गत गावांमधून रोपांची मागणी होत असून एकटय़ा तळोदा तालुक्यातील 30 पेसा गावांमधून 47 हजार रोपांची मागणी आह़े ही रोपे वनक्षेत्र, राखीव कुरण, गावठाण आणि शेतबांधांवर लावण्याचे नियोजन पेसा गावांचे आह़े वनविभागाकडून आठही वनक्षेत्रात प्रत्येकी 5 लाख 10 हजार, संस्थांच्या माध्यमातून एक लाख 50 हजार आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक लाख 80 हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आह़े वन क्षेत्रात साग, मोह,चारोळी, वड, पिंपळ, उंबर, खैर, आंबा, चिंच, निलगिरी यासह आयुव्रेदिक गुणधर्म असलेल्या विविध प्रजातीच्या बहुपयोगी झाडांची लागवड करण्यावर वनविभाग भर देत आह़े यासाठी स्थानिकांची मदत घेण्याचा विचार विभाग करत आह़े एकूण 19 लाख 40 हजार रोपांची लागवड करण्यात येणार असल्याने त्यासाठी यंदाचा पावसाळा संपल्यानंतर तात्काळ सुरूवात करण्यात येणार आह़े
हरित सातपुडय़ासाठी वनविभाग सरसावला
By admin | Published: May 31, 2017 2:52 PM