नंदुरबार : तळोदा तालुक्यातील धानोरा येथे श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाच्या समारोपात समाजातील पाच गरीब जोडप्यांचा सामुहिक विवाह लावण्यात आला. गावातील भागवत सेवा समिती व यजमानांच्या अशा आदर्श कार्याचे कौतुक केले जात आहे.तळोदा तालुक्यातील धानोरा येथील दोडे गुजर समाजातील भागवत सेवा समिती व यजमान तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय रमेश चौधरी यांनी ७ मार्च २०१९ पासून श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन केले होते. या सप्ताहाचा समारोप गुरुवारी करण्यात आला. याप्रसंगी समाजातील गरीब कुटुंबातील पाच जोडप्यांचे शुभमंगल समाजाच्या चालीरितीनुसार, पुरोहितांच्या मंत्रोपच्चाराने लावण्यात आले. कार्यक्रमास खासदार डॉ.हीना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, माजीमंत्री अॅड.पद्माकर वळवी, सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, डॉ.शशिकांत वाणी, नगराध्यक्ष अजय परदेशी, दोडे गुजर समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, व्यंकट पाटील, कृष्णदास पाटील, रघुवीर चौधरी, रतिलाल पाटील, तुंबडू पाटील, मोतीराम पाटील, हरकलाल पाटील, जगन चौधरी, गजानन पाटील, अरुण पाटील, गोपाळ चौधरी, विनोद चौधरी आदींसह समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमास खासदार डॉ.गावीत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भागवत सप्ताहातच समितीने समाजातील गरीब जोडप्याचे सामूहिक विवाह आयोजित केल्याने निश्चितच कौतुकास्पद कार्य आहे. त्यामुळे त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. अशा प्रकारचे सामूहिक विवाह सोहळे मोठ्या प्रमाणात साजरे करण्याचे आवाहनही केले. या वेळी आमदार डॉ.गावीत, आमदार पाडवी यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक पोलीस पाटील बापू पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शुभम चौधरी तर आभार संजय रमेश चौधरी यांनी मानले. कथेचे निरूपन खगेंद्र महाराज ब्राह्मणपुरीकर यांनी केले. सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.समाजातील दात्यांनी वधू-वरांना केली मदतरतिलाल पाटील, मोतीराम पाटील, रघुवीर चौधरी, दगडू पाटील, कृष्णदास पाटील, आनंदा पाटील, दशरथ पाटील, अश्विन चौधरी, संतोष पाटील, लक्ष्मण पाटील, संजय पाटील, धरमदास पाटील, तुमडू पाटील, गजानन पाटील, जगन चौधरी, हरकलाल पाटील, विनोद चौधरी, गोपाळ चौधरी, राजेंद्र चौधरी, मुकेश पाटील, अरूण पाटील, सोमेश पाटील, कुणाल पाटील, अर्जुन पाटील, आंबालाल पाटील, कमलेश पाटील आदी समाज बांधवांनी वधू-वरांना वस्तू स्वरूपात मदत केली. या सर्व दात्यांचा गौरव करण्यात आला होता. समाजातील कुकरमुंडा येथील महेंद्र पाटील यांचाही गौरव करण्यात आला.
भागवत सप्ताहात सामूहिक विवाह, पाच जोडप्यांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 8:27 AM