अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड तर प्रमुख अतिथी म्हणून बालविकास प्रकल्प अधिकारी साईनाथ वंगारी, नीती आयोगाचे दिगंबर गंधाले, पर्यवेक्षिका सी. एम. वसावे, धनदर, सुनीता वळवी, रंजना कांबळे, लोय शाळेचे मुख्याध्यापक माळी, लोयचे ग्रामसेवक डी. जी. देवरे, प्रशासक वाय. डी. पवार उपस्थित होते. संपूर्ण गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली,
या कार्यक्रमाअंतर्गत ‘सही पोषण देश रोशन’ प्रतिज्ञा घेण्यात आली. पोषण महाचे मुख्य उद्देश समजावत त्यात पौष्टिक आहार, लसीकरण, पूरक आहार याबद्दल माहिती राठोड यांनी दिली. तसेच लग्नाचे योग्य वय व महत्त्वाचे बाळाचे पहिले एक हजार दिवस याबद्दल माहिती वंगारी यांनी दिली. गंधाले यांनी परसबाग व आहारामध्ये पालेभाज्यांचा उपयोग, गावामध्ये पोषणस्तर सुधार घडून आणण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे हे पटवून दिले. यावेळी बीटच्या पर्यवेक्षिका वसावे यांनी स्वच्छता व परसबाग याविषयी माहिती दिली. तसेच किशोरी मुलींना मार्गदर्शन केले.
पोषण महा कार्यक्रमानिमित्ताने नटावद बीटच्या सर्व सेविका व मदतनीस यांनी या सर्व कार्यक्रमासाठी सहकार्य केले. पोषण रांगोळी, आहार प्रात्यक्षिके, आहार स्टॉल लावले व त्याविषयी गावकऱ्यांना माहिती दिली व या सर्व आहाराचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करावा याविषयी माहिती दिली. डोंगरपाडाच्या अंगणवाडी सेविका बबिता पाडवी व मदतनीस यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.