शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अक्कलकुव्यातील बहरलेल्या निसर्गात रुंदावतेय असुरक्षेची दरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 11:57 AM

वाण्याविहिर : सातपुडय़ात खुललेला निसर्ग आणि ओसंडून वाहणारे धबधबे पर्यटकांना खुणावू लागले आहेत़ गर्द हिरवळ आणि धुक्यात हरवलेल्या रस्त्यांचा आनंद घेणा:या पर्यटकांना मात्र यंदाही सुरक्षेची चिंता सतावत असून वर्षानुवर्षे सुविधा न पुरवल्या गेल्याने असुरक्षेची दरी रूंदावली आह़े  सातपुडय़ाच्या द:याखो:यातील 20 पेक्षा अधिक धबधबे ओसंडून वाहू लागल्याने याठिकाणी पर्यटकांची हजेरी लागत ...

वाण्याविहिर : सातपुडय़ात खुललेला निसर्ग आणि ओसंडून वाहणारे धबधबे पर्यटकांना खुणावू लागले आहेत़ गर्द हिरवळ आणि धुक्यात हरवलेल्या रस्त्यांचा आनंद घेणा:या पर्यटकांना मात्र यंदाही सुरक्षेची चिंता सतावत असून वर्षानुवर्षे सुविधा न पुरवल्या गेल्याने असुरक्षेची दरी रूंदावली आह़े  सातपुडय़ाच्या द:याखो:यातील 20 पेक्षा अधिक धबधबे ओसंडून वाहू लागल्याने याठिकाणी पर्यटकांची हजेरी लागत आह़े प्रामुख्याने लगतचे गुजरात राज्य आणि जिल्ह्यातील विविध भागातून हे पर्यटक याठिकाणी येत आहेत़ खाजगी वाहनाने विचारणा करत येथेर्पयत पोहोचणा:या या पर्यटकांना विविध सोयी सुविधा पुरवण्याबाबत यंदाही कारवाई झालेली नसल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े देवगोई घाटातून वाहणारे नैसर्गिक धबधबे तसेच दुर्गम व अती दुर्गम भागात असलेल्या पर्यटनस्थळार्पयत जाण्यासाठी रस्तेच नसल्याने जीव धोक्यात घालून पर्यटक मार्गस्थ होत असल्याचे चित्र सध्या आह़े या पर्यटकांसोबत एखादा अपघात किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्याची खबर कोणाला द्यावी याचीही व्यवस्था रस्त्यावर कोठे नसल्याने पर्यटनस्थळे असुरक्षेचे माहेरघर ठरत आहेत़ प्रशासनाने सातपुडय़ातील आदिवासी बांधवांसह तालुका विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े यासाठी योग्य तो निधी मिळाल्यास पर्यटकांचा ओघ वाढून रोजगार उपलब्ध होणार आह़े अक्कलकुवा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील कांजीघाटचा धबधबा हा पावसाळ्यात पर्यटकांचे सर्वात मोठे आकर्षण असतो़ सध्या ओसंडून वाहणा:या या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी होत आह़े याठिकाणी अक्कलकुवा शहरासह गुजरातमधील पर्यटक हजेरी लावतात़ मोलगीकडे रस्त्यावरून देवमोगरा पुनवर्सन गावापासून जवळ असलेल्या या धबधब्यार्पयत जाण्यासाठी योग्य रस्ता नाही़ धबधबा जेथे आह़े तेथे कोणतीही सुरक्षा नाही़ ऐनवेळी दुर्घटना घडल्यास मदतकार्य करण्याचीही सोय नाही़ सातपुडय़ात थंड हवेचे ठिकाण असलेल्या डाब गावाच्या अलीकडे देवगोई घाट हा धबधब्यांचे माहेरघऱ याठिकाणी सध्या 20 पेक्षा अधिक छोटे मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत़ येथील देवगोईच्या धबधब्यार्पयत जाण्यासाठी रस्ता नसल्याने पर्यटक खाचखळग्यातून पायी जातात़ यात दुखापती होण्याची अधिक शक्यता असत़े दुर्गम भागात करंजखाडी, मोगरा याठिकाणी दहेल नदीवरील धबधबे आहेत़ तसेच ओघाणीचा खांबा घाट, गोरज्याबारीपाडा, ओहवा, खाईचा माजी सरपंचपाडा, पाटीलपाडा, कौलवीमाळचा घाट, तिंती घाट तसेच निंबीपाडा आणि ओलखाडीपाडा येथील मोठे धबधबे पर्यटकांचे आकर्षण ठरतात़ अनोळखी पर्यटकांना या धबधब्यांची माहिती तसेच तेथे पोहोचावे कसे याबाबत योग्य ती माहिती नसल्याने त्यांचे हाल होत आहेत़ यामुळे जागोजागी मदतकक्षांचे क्रमांक आणि धबधब्यांकडे जाण्याची माहिती देण्याची गरज आह़े