लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतक:यांना जमिनीनुसार पिकांचे नियोजन करण्यासाठी जमिनीच्या आरोग्य पत्रिकेला अर्थात मृद तपासणीला विशेष महत्त्व आले आहे. परंतु नंदुरबार जिल्ह्यात याची कुर्म गती पहाता शेतक:यांना पिकांचे नियोजन करतांना पारंपारिकताच लक्षात ठेवावी लागत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरात केवळ 319 गावांमध्ये अभियान राबवून 23 हजार 498 मृद आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आल्या.मे 2017 पाूसन राज्यात कृषी खात्यातून वेगळे करीत नवीन मृद व जलसंधारण खाते अस्तित्वात आले आहे. त्यामुळे या खात्यातर्फे जमीन आरोग्यय पत्रिकेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. पहिल्या वर्षी गती चांगली होती. परंतु नंतर मरगळ आल्याचे चित्र आहे. शेतक:यांना जमिनीनुसार पिकांचे नियोजन करण्यासाठी जमिनीच्या आरोग्य पत्रिकेला अर्थात मृद तपासणीला विशेष महत्त्व आले आहे. शासन पातळीवर ते गांभिर्याने घेतले गेले आहे.राज्यात 2014-15 पासून याबाबत गांभिर्याने घेतले जात आहे जमिन आरोग्य पत्रिका योजनेअंतर्गत प्रत्येक क्षेत्राचे माती परिक्षण करून घेणे आणि जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेवून खतांचे प्रमाण निश्चित करणे व त्यांचा वापर करणे हा उद्देश आहे. योजनेअंतर्गत जिल्ह्यातील गावांची टप्प्याटप्प्याने निवड करून सर्व शेतक:यांना जमिन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून ते समजवून दिले जात आहे.रासायनिक खतांचा अर्निबध वापर कमी करून मृत तपासणीवर आधारीत अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलीत व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देणे. मृत आरोग्य सुधारण्यासाठी तसेच मुलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रीय खते, गांढुळखत, निंबोळी/सल्फर आच्छादीत युरियासारख्या संथ गतीने नत्र पुरवठा करणा:या खतांचा वापरास प्रोत्साहन देणे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे पिकांच्या उत्पादकतेत वाढ करणे. क्षमता वृद्धी, कृषी शाखेच्या विद्याथ्र्याचा सहभाग आणि भारतीय कृषी संशोधन अनुसंधान,कृषी विद्यापीठातील मृद तपासणी प्रयोगशाळांच्या कार्यपद्धतीत सुधारणा घडवून आणने, जमिनीच्या उत्पादकतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यांमध्ये मृत नमुने काढण्याच्या व तपासणीच्या पद्धतीमध्ये समानता आणने व निर्धारीत जिल्ह्यांमध्ये तालुका, परिमंडळस्तरीय खतांच्या शिफारशी विकसीत करणे हे उद्देश आहेत.2016-17 मध्ये 450 गावातील 23688 मृद नमुने तपासणी करण्यात आली होती. त्यातून 61 हजार 969 मृत आरोग्य पत्रिकांचे वितरण शेतक:यांना करण्यात आले आहे.गेल्या वर्षाची स्थिती पहाता नंदुरबार तालुक्यात 68 गावांमधील तीन हजार 878 शेतक:यांना जमिन आरोग्य पत्रिका देण्यात आली. वर्षभरात 85 गावातील पाच हजार शेतक:यांना देण्याचे उद्दीष्ट आहे. नवापूर तालुक्यातील 57 गावांमध्ये तीन हजार 733 शेतक:यांना दिली गेली असून वर्षभरात 102 गावातील पाच हजार शेतक:यांना देणार आहे. अक्कलकुवा तालुक्यात 87 गावातील चार हजार शेतक:यांना दिली असून वर्षभरात 103 गावातील चार हजार शेतक:यांना देणार आहेत. शहादा तालुक्यातील 71 गावातील पाच हजार 395 शेतक:यांना दिली असून वर्षभरात 112 गावातील पाच हजार शेतक:यांना देणार आहेत. तळोदा तालुक्यातील नऊ गावातील 1978 शेतक:यांना दिली असून वर्षभरात 82 गावातील दोन हजार शेतक:यांना देणार आहेत तर धडगाव तालुक्यात 57 गावातील दोन हजार 200 शेतक:यांना आरोग्य पत्रिका दिली असून वर्षभरात 102 गावातील 2302 शेतक:यांना ती दिली जाणार आहे.