नंदुरबार/शहादा/तळोदा : महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली आह़े प्रत्यक्षात मात्र ही घोषणा केवळ कागदावरच असल्याचे चित्र जिल्हाभरात बघायला मिळत आह़े आतार्पयत जिल्हाभरात 2 लाख 31 हजार 835 शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आह़े परंतु असे असले तरी याचा कितपत वापर करण्यात येतोय याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आह़ेजिल्हा परिषदेच्या ग्रामीण स्वच्छता विभागातर्फे जिल्हाभरात 2 लाख 31 हजार 835 शौचालयांचे बांधकाम करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आह़े तसेच शौचालयांचे 100 टक्के उद्दीष्टपूर्ती झाल्याचेही म्हटले जात आह़े परंतु प्रत्यक्षात असे असूनही ग्रामीण भागातील बहुतेक ग्रामस्थ शौचालयासाठी लोटे घेऊन बाहेर जात असल्याचेच चित्र दिसून येत आह़े नंदुरबार तालुक्यात 40 हजार 617, धडगाव 23 हजार 533, अक्कलकुवा 37 हजार 918, नवापूर 50 हजार 257, शहादा 56 हजार 750 तर तलोदा येथे 22 हजार 760 शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आह़े नंदुरबार शहरातील होळतर्फे हवेली, दुधाळे शिवार आदी परिसरात रस्त्याच्या बाजूला मोठय़ा संख्येने नागरिक शौचास बसत असल्याचे दिसून येत़े त्यामुळे हगनदारीमुक्त हा केवळ फार्स आहे की काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आह़े शहादाशहादा पंचायत समितीअंतर्गत ग्रामीण भागात हागणदारीमुक्तसाठी 101 ग्रामपंचायतींसाठी सुमारे 30 हजार शौचालय तयार करण्यात आले आहेत़ परंतु अजूनही 40 टक्के लोक रस्त्याच्या कडेला शौचालयासाठी जात असल्याची स्थिती शहरात आह़े स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत शहरी व ग्रामीण भागात शौचालय योजना सुरु होती़ गावाच्या बाहेर रस्त्यालगत तसेच शेतात बहुतेक लोक शौचाला जात असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे बहुतेक परिसरात दरुगधीचेही साम्राज्य पसरलेले आह़े राज्य शासनाने स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत हजारो शौचालयांचे बांधकाम केले असले तरी याचा वापर नागरिक करताय की नाही? याकडे प्रशासन लक्ष देण्यास तयार नसल्याची स्थिती आह़े शौचालय बांधकामासाठी लाभाथ्र्याना 12 हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येत असत़े परंतु अनेक लाभार्थीसुध्दा केवळ अनुदान मिळवण्यापूर्ती शौचालयाचे प्रस्ताव सादर करीत असल्याचे वास्तव चित्र समोर येत आह़े शहादा तालुक्यात तिखोटा, डोंगरगाले, मोहिदा, सोनवद, असलोद, पिपडे, पिंगाणे, अनरद, लांबोळा, कुकावल, कोठली, वडाळी, सावखेडा, पिंपर्डेसह इतर ग्रामीण भागातसुध्दा रस्त्याच्या कडेला शौचास बसण्याचे प्रकार सुरु आहेत़ याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देत दोषींवर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षीत आह़े परंतु केवळ शौचालयाचे बांधकाम झाले म्हणून योजना सफल झाली असा प्रशासनाचा समज होऊन बसला आह़े तालुक्यातील 101 ग्रामपंचायतीत सुमारे 30 हजार 531 शौचालय तयार करण्यात आले असल्याची प्रशासनाची माहिती आह़े यात 40 टक्के लाभार्थी शौचालयाचा वापर करत नसल्याची माहिती आह़े तर काही लाभाथ्र्यानी शौचालयाचा वापर लाकडे, भांडी, शेती अवजारे आदी साहित्यांची साठवणूक करण्यासाठी केला असल्याचे दिसून येत आह़े सावळदा, सजदे, शेल्टी, आडगाव, बहिरपूर, गहाणा, दरा, पिंप्राणी, राणीपूर या भागात आजही रस्त्याच्या बाजूला ग्रामस्थ शौचास बसत असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली़ अनेक ठिकाणी शौचालय आहे, परंतु वापरण्यास पूरेसे पाणी नसल्याने ते वापरात आणणे शक्य नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आल़े दरम्यान, शहादा नगरपरिषदअंतर्गत राहणारे लोक गोमाई नदी किनारी, जूना प्रकाशा रोड, भिलाली या भागात शौचास जात आहेत़ खेतिया, चाररस्ता, नवीन भाजी मार्केटलगत, कुकडेल, जूना प्रकाशा रोड या भागात प्रशासनाकडून केवळ दोन वर्षात शौचालये बांधण्यात आलेली आह़े शहाद्यासह, धडगाव, अक्कलकुवा तसेच नवापूर तालुक्यातसुध्दा अशी परिस्थिती निर्माण झालेली आह़े शौचालय असूनदेखील अनेक लाभार्थी शौचास बाहेर जात असल्याचे विदारक चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहेत़ त्यामुळे याबाबत संबंधित प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करुन स्वच्छ भारत मिशनची कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आह़े
नंदुरबार जिल्ह्यात हगणदरीमुक्ती राहतेय कागदावरच.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 1:29 PM