लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : क्वारंटाईन केलेल्या लोकांची आरोग्य तपासणी नाही, स्वॅब घेणे नाही, केंद्रातील असुविधा यामुळे नंदुरबारातील तिन्ही क्वॉरंटाईन केंद्रात दाखल लोकांमध्ये नाराजी आहे. अगदी कारागृहात कोंडल्यासारखी स्थिती झाली असून कोरोनापासून वाचविण्यासाठी उलट त्यात ढकलण्याचा हा प्रकार असल्याची भावना या लोकांची झाली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील अनेकांनी तक्रारी केल्या आहेत.नंदुरबारात तीन ठिकाणी क्वॉरंटाईन केंद्र आहे. त्यात पॉलिटेक्नीक महाविद्यालयाचे वसतिगृह, होळ शिवारातील आदिवासी शासकीय मुलींचे वसतिगृह आणि समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह यांचा समावेश आहे. या तिन्ही ठिकाणी मिळून जवळपास १२५ पेक्षा अधीकजण दाखल करण्यात आले आहेत. परंतु या केंद्रांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याची तक्रार आहे. पॉलिटेक्निक वसतिगृहाच्या केंद्रात तर सर्वाधिक समस्या आहेत. उरलेले अन्न, कचरा, तेथील कर्मचाऱ्यांनी घातलेले पीपीई किट परिसरातच टाकला जात आहे. तेथे मोकाट गुरे चरत असतात. यामुळे प्रादुर्भावची शक्यता आणखी वाढली आहे. याशिवाय या ठिकाणी पाण्याची देखील समस्या आहे.स्रानगृह आणि स्वच्छतागृहातील नळांना पाणी येत नाही. एका ड्रममध्ये पाणी भरून ठेवले जाते. त्यातूनच सर्वजण पाणी घेत असतात. त्यामुळे संक्रमणाचा धोका आणखी वाढला आहे. येथे देण्यात येणाºया जेवनाची क्वॉलिटी देखील दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. शुक्रवारी दिल्या गेलेल्या जेवनातील टमाटरमध्ये अळ्या निघाल्याची तक्रार काहींनी केली.गुरुवारी तापी-नर्मदा इमारतीमधील क्वॉरंटाईन लोकांनी विविध मागण्यांसाठी थेट क्वॉरंटाईन केंद्रातील मोकळ्या जागेत येऊन आम्हाला घरी जाऊ द्या अशी मागणी केली. अखेर अधिकाºयांनी समजविल्यानंतर तेथील लोकं शांत झाले.एकुणच क्वॉरंटाईन केंद्रातील लोकांमधील नाराजी वाढत असून तातडीने सुधारणा कराव्या अशी मागणी करण्यात येत आहे.
क्वॉरंटाईन केंद्रात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तेथे दाखल असलेल्यांच्या तक्रारींची लागलीच दखल घेतली जात आहे. वैद्यकीय पथक देखील त्या ठिकाणी २४ तास तैणात आहे. जेवनाचा दर्जाही चांगला ठेवला जात आहे. तरीही काही तक्रारी असल्यास त्याची दखल घेऊन त्या सोडविल्या जातील. क्वॉरंटाईन लोकांनी देखील सहकार्य करणे अपेक्षीत आहे.-भाऊसाहेब थोरात,तहसीलदार, नंदुरबार.