लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असली तरी वातावरणात वाढत असलेल्या आद्रतेमुळे नागरिक सर्वाधिक त्रस्त झाले आहेत़ दिवसेंदिवस आद्रतेत वाढ होत असून शनिवारी नंदुरबारात 43 अंश सेल्सिअस तापमान तर तब्बल 33 टक्के आद्रतेची नोंद करण्यात आली आह़ेमध्य प्रदेश, राजस्थान येथून मोठय़ा प्रमाणात उष्ण लहरी येत असून त्याचा वेग ताशी 22 ते 25 प्रती किलोमीटर असल्याचे ‘स्कायमेट’ या हवामान संस्थेकडून नोंदविण्यात आले आह़े त्यामुळे साहजिकच नंदुरबारात तसेच नंदुरबारातील सिमावर्ती भागात उष्णतेची लाट दिसून येत आह़े गुरुवार व शुक्रवारी 42 ते 44 अंशादरम्यान तापमानाची नोंद करण्यात आली आह़े दिवसागणिक तापमानात वाढ होत आह़े त्यासोबत आद्रताही नवनवीन उच्चांक गाढत आह़े शनिवारी दिवसभर कमी दाबाचा वीजपुरवठाऐन उन्हाळ्याचे दिवस असताना शनिवारी तांत्रिक कारणामुळे महावितरणकडून कमी दाबाचा वीजपुरवठा पुरविण्यात येत होता़ त्यामुळे पंख्यासोबतच कुलर्ससुध्दा पूर्ण क्षमतेने चालत नव्हत़े तांत्रिक कारणांमुळे नंदुरबार शहर, पातोंडा, एकता नगर, खांडबारा, टोकरतलाव, पळाशी, कोठली, करणखेडा, चौपाळे, खोंडामळी, कोपर्ली, शिंदे, वैदाने, एकता नगर, विसरवाडी, नवापूर, खातगाव, विसरवाडी, बिलबारा, रायपूर आदी परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित करण्यात आला होता़ तसेच दिवसभर या ठिकाणीचा वीजपुरवठा कमी दाबाचा होता़ त्यामुळे साहजिकच नागरिकांचे यातून मोठे हाल झाल़े वाढत्या आद्रतेने आधीच घामोघाम झालेल्या नागरिकांना शनिवारी दिवसभर उकाडय़ाचा सामना करावा लागला़ रात्रीसुध्दा वीजपुरवठा खंडित झाला नसला तरी अत्यंत कमी दाबाच्या वीजपुरवठय़ाने नागरिकांची गैरसोय झाली़ यंदाच्या मोसमात तापमानापेक्षा आद्रतेने नागरिक सर्वाधिक हैराण झाले होत़े दुपारच्या वेळी तसेच रात्रीसुध्दा उष्णलहरी जाणवत असतात़ मध्यरात्री काही प्रमाणात शित लहरी असल्याने नागरिक घरात झोपण्यापेक्षा घराच्या छतावर झोपण्यास अधिक पसंती देत आहेत़ तसेच उकाडय़ापासून दिलासा मिळावा यासाठी उपाय योजना करीत आहेत़
नंदुरबारात तापमानापेक्षा आद्रतेने हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:51 PM