लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत आरोग्य तपासणी करणाºया आशा वर्कर महिलेच्या कानशिलात लगावल्याची घटना खैराळे, ता.नंदुरबार येथे घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खैराळे येथे आरोग्य तपासणी मोहिमेअंतर्गत आरोग्य तपासणी सुरू होती. अंगणवाडी नजीक आशा वर्कर सुताबाई भिवाजी वळवी यांनी गावातीलच विष्णू गिमल्या वळवी (३३) यांची आरोग्य तपासणी करतांना त्यांच्या आॅक्सिजनची पातळी तपासणी करतांना त्यांना राग आला. त्यातून विष्णू वळवी यांनी सुताबाई यांच्या थेट कानशिलात लगावली. ढकलून देत पोटात दोन ते तीनदा पायाने मारून शिविगाळ केली.याप्रकरणी सुताबाई वळवी यांनी फिर्याद दिल्याने विष्णू वळवी यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणने, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणे याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करण्यात आली असून तपास फौजदार कमलाकर चौधरी करीत आहे.
आरोग्य तपासणी करणाऱ्या महिलेच्या मारले कानशिलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 12:01 PM