लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयात ह्रदयरोग शस्त्रक्रिया पूर्वतपासणी शिबिर घेण्यात आले़ यात १३८ रुग्णांची तपासणी करण्यात आली़ रोटरी क्लब नंदुरबार व नाशिक येथील एसएमबीटी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला़राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात २६ पथक निर्माण करण्यात आले आहेत़ हे पथक शून्य ते १८ वयोगटातील लाभार्थींची संपूर्ण आरोग्य तपासणी करुन रुग्णांच्या आजाराची माहिती आरोग्य विभागापर्यंत पोहोचवतात़ यांतर्गत रुग्णांची योग्य तपासणी व्हावी यासाठी ह्रदयरोगाने ग्रस्त लाभार्थींच्या हे शिबिर घेण्यात आले़ शिबिरात १३८ लाभार्थींची तपासणी करण्यात आली. २०१३ पासून सुरु असलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत नंदरबार जिल्ह्यातील २०० पेक्षा जास्त बालकांवर हृदयशस्त्रक्रीया पूर्ण करण्यात आली आहे़ तसेच जिल्ह्यातील ८०० पेक्षा जास्त बालकांवर इतर शस्त्रक्रीया पुणे, मुंबई, नाशिक शहरातील मधील नामांकित खाजगी रुग्णालयात पूर्ण करण्यात आल्या आहेत़जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयक समस्या सुटत असल्याची माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली़ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर झाले़ शिबिरात डॉ.सुरेश पाटील, डॉ.यशवंत दिघे, अनिकेत दुबे यांनी रुग्णांची तपासणी केली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे अधिकारी, कर्मचारी व रोटरी क्लब आॅफ नंदुरबारच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
जिल्हा रुग्णालयात ह्रदयरोग तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 12:33 PM