लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मोठी वर्दळ शिवाय आंतरराज्य वाहतुक होणाऱ्या सीबी पेट्रोलपंपजवळील चौकातील वळण अगदी काटकोन स्वरुपाचा असल्यामुळे अवजड वाहतुकीसाठी हा चौक प्रतिकुल ठरत आहे. काटकोनी वळणामुळे चालकांना विरुद्ध दिशेने येणारे वाहन दिसत नाही, परिणामी या चौकात अपघात संभवतो.नंदुरबार शहराबाहेरून जाणारा मार्ग गुजरातला जोडत असल्याने या मार्गावरुन लहान वाहतुकीसह आंतरराज्य वाहतुक देखील होत आहे. दोन राज्यातील प्रवासी व वाहनधारकांसाठी सोयीचा असलेल्या या मार्गावर ठिकठिकाणी अपघाताची शक्यता असते. त्यात तळोदा रोड तथा सी.बी.पेट्रोल पंपजवळील चौक हे एक ठिकाण आहे. या चौकातून जाणाºया वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते. त्यातच नंदुरबार शहराच्या वाढत्या विस्तारामुळे लहान वाहने व पायी चालणारे नागरिकही अधिक असतात. त्यामुळे हा चौक वाहनांसह नागरिकांची नेहमीच वर्दळ राहत असून सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.चौकाची जागाच कमी असल्यामुळे नंदुरबार पालिका प्रशासनामार्फत शहरांतर्गत रस्त्यांचे काम करतांना प्रत्येक रस्त्यांवर दुभाजक देखील बनविण्यात आले. त्यात या चौकातील दुभाजक अवजड वाहतुकीला अडचण येऊ नये, यासाठी अपेक्षेनुसार योग्य अंतर ठेवून दुभाजक तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार तथा अपघात होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणेमार्फत योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.आंतरराज्य वाहतुक महामार्ग असल्यामुळे या मार्गावरुन नियमित अवजड वाहतुक सुरू आहे. जड वाहतुकीच्या दृष्टीने हा चौक अपुरा ठरत आहे. सुरक्षीत वाहतुक शिवाय पायी चालणाºया नागरिकांसाठी या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध मार्ग विभाजक उभारत चौफुली तयार करण्याची आवश्यकता आहे. परंतु वाहनांची वर्दळ लक्षात घेता चौफुलीसाठी मुबलक जागेची आवश्यकता आहे. आवश्यकतेनुसार जागा या ठिकाणी उपलब्ध होणार नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.४या चौकात चारही बाजूने व्यावसाय सुरू झाल्यामुळे चौफुली तयार करण्याचा प्रस्ताव सुरू झाल्यास चौफुलीसाठी नेमकी कशी जागा उपलब्ध होणार? असा प्रश्न देखील नागरिकांधून उपस्थित करण्यात येत आहे. तर बहुतांश नागरिकांमार्फत चौफुली तयार करण्याची मागणीच होत आहे.नंदुरबार पालिकेमार्फत तीन वर्षांपूर्वी शहरातील रस्ते विकासाची कामे हाती घेतली होती, त्यावेळी या चौकात मोजणी करण्यात आली होती. ती मोजणी कदाचित चौफुली निर्मितीसाठीच करण्यात आली असावी, असे नागरिकांमार्फत सांगण्यात येत आहे. परंतु पुढे त्या ठिंकाणी कुठलेही काम करण्यात आले नाही, त्यामुळे नागरिकांमधून येथे चौफुलीचे स्वरुप दिले जाणार नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे.नंदुरबार शहराबाहेरुन जाणारा हा रस्ता दुपरी ठरत असला तरी हा चौक मात्र अपवाद आहे. गुजरातकडे जाणारी वाहने थेट रस्त्याच्या बाजूला उभारलेल्या दुकानांमध्ये घुसण्याची शक्यता असते. तर गुजरात व तळोदाकडून येणारी वाहने समोरिल रिक्षा स्टॉपवर उभ्या रिक्षांच्या दिशेने जातात. परंतु प्रत्येक चालकांकडून दुकाने व रिक्षांची काळजी घेतली जाते. मात्र ही काळजी घेतांना दोन्ही बाजूने येणाºया वाहनांच्या चालकांना आपापली साईड अनावश्यकपणे दाबावी लागते, साईड तोडतांना वाहतुकीचे नियमही तोडावे लागत आहे.सी.बी.पेट्रोलपंपजवळील चौक वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. या चौकात मोठे अपघात झाले नसले तरी गंभीर अपघाताची शक्यता आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी या ठिंकाणी पोलीस चौकीची नितांत आवश्यकता भासत आहे.रस्ता ओलांडणाºया पादचाऱ्यांना या चौकात तिन्ही बाजूने लक्ष ठेवावे लागत असून ते काही जणांकडून शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे.
अवजड वाहतुकीने चौक ठरतो अवघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 12:11 PM