लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 37 लघु प्रकल्पांमध्ये अवघा 50 टक्के पाणीसाठा आहे. त्यातील सहा प्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे. तर सात प्रकल्पांमध्ये 80 टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा आहे. इतर सर्व प्रकल्पांमध्ये 20 ते 60 टक्के पाणी आहे. यामुळे रब्बी हंगामावर परिणाम होणार असून ऐन उन्हाळ्यात हे प्रकल्प कोरडे होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक मध्यम प्रकल्पात 36 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात यंदा अवघा 67 टक्के पाऊस झाला आहे. झालेला पाऊस देखील नियमित नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये अपेक्षीत पाणीसाठा यंदा झालाच नाही. परिणामी रब्बी हंगामासाठी पाण्याची आवर्तने यंदा सोडली जाणार नाहीत. पाणीसाठा झाला नसल्यामुळे जमिनीतील पाणी पातळी देखील मोठय़ा प्रमाणावर खालावली आहे. येत्या दोन महिन्यात यातील अनेक प्रकल्पांमध्ये ठणठणाट होणार आहे.जिल्ह्यात एकुण 37 लघु प्रकल्प आहेत. चार मध्यम तर दोन बॅरेज प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची सद्य स्थितीत पाणीसाठा अतिशय कमी आहे. सरासरीचा एकुण 50.41 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच कालावधीर्पयत अर्थात नोव्हेंबरअखेर 70 टक्के पाणीसाठा होता. सहा प्रकल्प कोरडेजिल्ह्यातील सहा प्रकल्पांमध्ये ठणठणाट झाला आहे. त्यात कोकणीपाडा, शनिमांडळ, ठाणेपाडा 1, वासदरा, वावद ता.नंदुरबार, गढावली, ता.तळोदा या प्रकल्पांचा समावेश आहे. तर 80 टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांमध्ये नवापूर तालुक्यातील खेकडा 87 टक्के, खोकसा 82 टक्के, मुगधन 90 टक्के, रायंगण 96 टक्के, आंबेबारा, ता.नंदुरबार 95 टक्के, धडगाव तालुक्यातील सिंगसपूर 88 तर उमराणी 84 टक्के पाणीसाठा आहे. इतर प्रकल्पही जेमतेमजिल्ह्यातील इतर प्रकल्पांचा विचार करता नवापूर तालुक्यातील हळदाणी प्रकल्पात 43 टक्के, खडकी प्रकल्पात 13 टक्के, मेंदीपाडा 40 टक्के, नावली 16 टक्के, सोनखडकी 61, सुलीपाडा 44, विसरवाडी 74. नंदुरबार तालुक्यातील धनीबारा 31, खोलघर 69, पावला 23, शिरवाडे 64, ठाणेपाडा दोन 15, वसलाय 37. शहादा तालुक्यातील दुधखेडा 41 टक्के, खापरखेडा 40 टक्के, कोंढावळ 31 टक्के, लंगडीभवानी 57 टक्के, लोंढरे 34, राणीपूर 54, शहाणे 44. अक्कलकुवा तालुक्यातील खडकुना प्रकल्पात 58, तळोदा तालुक्यातील महुपाडा 43 टक्के, पाडळपूर 38, रोझवा प्रकल्पात 42 टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पांची एकुण सरासरी 50. 40 टक्के आहे. गेल्यावर्षी याच प्रकल्पांमध्ये सरासरीचा 70 टक्के पाणीसाठा होता.मध्यम प्रकल्प ब:यापैकी मध्यम प्रकल्पांपैकी रंगावली, ता.नवापूर प्रकल्पात 98 टक्के, शिवण, ता.नंदुरबार प्रकल्पात 36, दरा, ता.शहादा प्रकल्पात 85 टक्के तर राणीपूर प्रकल्पात 65 टक्के पाणीसाठा आहे. याशिवाय प्रकाशा बॅरेजला 81 तर सारंगखेडा प्रकल्पात 78 टक्के पाणीसाठा आहे.नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक अर्थात शिवण प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. या प्रकल्पातील सर्व पाणीसाठा पालिकेने राखीव केला आहे तर आंबेबारा प्रकल्पातील पाणीसाठा देखील पालिकेने आरक्षीत केला आहे. त्यामुळे ब:यापैकी या प्रकल्पाचीही मदत होणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सहा सिंचन प्रकल्पांमध्ये ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:58 PM