लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार, नवापूर, शहादा व तळोदा तालुक्यातील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे अनेक प्रस्ताव धुळखात असल्याची माहिती आह़े अनेक प्रस्तावांमध्ये कागदोपत्री असलेली तृटी व तहसील कार्यालयांमध्ये वाढत्या ऑनलाईन कामांचा व्याप यामुळे निराधारांना मदतीचा ‘हात’ देण्यास कुणी तयार नसल्याचीच स्थिती एकंदर जिल्ह्यात निर्माण झाली आह़े नंदुरबार तालुक्यातील तहसील कार्यालयास 2015 ते ऑगस्ट 2017 र्पयत संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत केवळ 694 एकूण अर्ज प्राप्त आहेत़ पैकी, 559 अर्ज मंजुर करण्यात आले आहेत तर 135 अर्ज नामंजुर करण्यात आले आह़े याबाबत विचारले असता, प्रस्तावांमध्ये कागदोपत्री तृटी आढळल्याने सदर अर्ज नामंजुर होत असल्याचे संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार शेखर मोरे यांनी दिली आह़े त्याच प्रमाणे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत 2015 ते ऑगस्ट 2017 र्पयत एकूण 729 प्रस्ताव नंदुरबार तहसील कार्यालयास प्राप्त झाले असून त्यापैकी, 563 अर्ज मंजुर तर 166 अर्ज नामंजुर करण्यात आले आह़े शहादा तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत 2015 मध्ये 259 प्रस्तावांपैकी 208 मंजुर तर 51 नामंजुर करण्यात आले त्याच प्रमाणे, 2016 मध्ये एकूण 992 पैकी, 462 मंजुर तर 450 नामंजुर करण्यात आले आहेत़ नोव्हेंबर 2017 र्पयत एकूण 355 प्रस्तवांपैकी 223 मंजुर तर 132 नामंजूर करण्यात आले आहेत़ त्याच प्रमाणे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत 2015 साठी एकूण 593 अर्जापैकी 401 मंजुर तर 192 नामंजुर करण्यात आले आहेत़ 2016 मध्ये एकूण 793 प्रस्तवांपैकी 499 मंजुर तर 294 नामंजुर झाले आहेत़ नोव्हेंबर 2017 मध्ये 289 एकूण अर्जापैकी 131 मंजुर तर 158 नामंजुर झाले आहेत़ नवापूर तहसील कार्यालयात 2015 मध्ये दोन्ही योजनांचे मिळूण एकूण 687 प्रस्वात प्राप्त झाले होत़े त्यापैकी 536 मंजुर तर 151 नामंजुर करण्यात आले होत़े 2016 मध्ये दोन्ही योजना मिळूण एकूण 316 प्रस्ताव प्राप्त झाले होत़े त्यापैकी 286 अर्ज मंजुर तर 30 अर्ज नामंजुर करण्यात आले होत़े ऑगस्ट 2017 र्पयत एकूण 7 प्रस्ताव प्राप्त झाले होत़े यातील सर्वच प्रस्ताव मंजुर करण्यात आले होत़े संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत निराधारांना अनुदानाचे वाटप करुन त्यांना आर्थिक दृष्टय़ा हातभार लावणे महत्वाचे असत़े परंतु कागपत्रांबाबत योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने अनेक लाभाथ्र्याच्या प्रस्तावांमध्ये तृटी निघत असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे प्रशासनाकडून या योजनांची माहिती लाभाथ्र्यापर्यत योग्यरित्या पोहचावी यासाठी शिबीर तसेच मार्गदर्शक वर्ग घेण्याची आवश्यकता आह़े जेणे करुन या योजनांचा लाभ योग्य व गरजु लाभाथ्र्यार्पयत पोहचणे शक्य होणार आह़े
निराधारांना गरज मदतीच्या हातांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 4:59 PM