लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत खासदार डॉ.हिना गावीत यांनी संसदेत जवळपास अर्धा तास भाषण करून आपले लक्ष वेधून घेतले. त्यांनी मोदी सरकारच्या कामकाजावर भाष्य करीत काँग्रेसवरही जोरदार टिका केली. खासदार डॉ.हिना गावीत यांना संसदेत आज अर्धा तासांचा वेळ देण्यात आला होता. त्यांनी सुरुवातीला आपण भाजपमध्ये का आलो याचे विवेचन केले. 2014 र्पयत नंदुरबार मतदारसंघातील आदिवासी गाव, पाडय़ांर्पयत वीज पोहचली नव्हती, आरोग्याच्या सुविधा नव्हत्या, रस्ते नव्हते. वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर गावोगावी आपण आरोग्य शिबिरे घेतली. त्यातून ज्या समस्या आणि प्रश्न दिसून आले ते सोडविण्यासाठी आपण राजकारणात प्रवेश केला. पंतप्रधान मोदी यांनी आपल्यावर विश्वास टाकून तिकीट दिले आणि निवडूनही आलोत. निवडल्यानंतर गेल्या पाच वर्षात मतदारसंघात केंद्राच्या विविध योजनांच्या माध्यमातून कामे केली. प्रधानमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे विणले, उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून हजारो कुटूंबांना लाभ दिला. वीज पोहचवली, दूरसंचारचे जाळे निर्माण केले. त्यामुळे दुस:यांदा देखील आपल्याला मोठय़ा मताधिक्याने जनतेने निवडून दिल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांवरही प्रकाशझोत टाकत विकासाचा आलेख मांडला. त्यांच्या या भाषणाची जिल्ह्यात विविध क्षेत्रात चर्चा होती.
हिना गावीत यांचे लोकसभेत जोरदार भाषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:00 PM