नंदुरबार: नंदुरबार लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ़ हिना गावीत यांनी चांगलीच मुसंडी मारली आहे़ त्या तब्बल २४ हजार ६७६ मतांनी आघाडीवर असल्याची माहिती आहे़ अॅड़ के़सी़ पाडवी यांना २ लाख ६० हजार ९८२ तर डॉ़ हिना गावीत यांना २ लाख ८५ हजार ६५८ इतकी मत पडलेली आहेत़ एकूण २७ फेऱ्या होणार आहेत़ दरम्यान, सकाळी ८ वाजेपासून सुरुवातीला टपाली मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती़ नंदुरबार येथील खोडाई माता रस्त्यावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली होती़ मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे़
नंदुरबारात हिना गावीत २४ हजार ६७६ मतांनी आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 11:43 AM