लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : श्वानाने चावा घेतल्याने मृत पावलेल्या व्यक्तींच्या मृत्यूस कारणीभूत ठरणा-यांवर कारवाई करावी मागणीसाठी बुधवारी नगरपालिकेवर मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. प्रसंगी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. दरम्यान मुख्याधिकारी यांच्यासोबत चर्चा करुन मोर्चेक-यांनी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. श्वानाने चावा घेतल्याने दोघांच्या मृत्यूप्रकरणी कारवाईची मागणी करत हिंदु सेवा सहाय्य समिती उपोषण करण्यात आले होते. उपोषणानंतर पालिका प्रशासनाने समाधानकार आश्वासन न दिल्याने मूकमोचा व ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी दुपारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरापासून मोर्चा काढण्यात आला. मोर्चात माजी आमदार शिरीष चौधरी, भाजपचे डॉ.रविंद्र चौधरी, राष्ट्रीय समाज पक्षाचे दिलीप ढाकणे पाटील, नरेंद्र पाटील, मयुर चौधरी, मृत बालिकेचे वडील मुकेश माळी, मोहित राजपूत यांच्यासह विविध संघटना, सेवाभावी संस्था यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.
िंदू सेवा सहाय्य समितीचा पालिकेवर मूकमोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 1:03 PM