नंदुरबार : एचआयव्ही-एड्सची लागण झाल्यावर समाजापासून दुरावलेल्या रूग्णांना सन्मानाने जगता यावे यासाठी जिल्हा एड्स नियंत्रण संस्था आणि सेवाभावी संस्था यांच्यावतीने बचत गट तयार करण्यात आले होत़े या बचत गटांना बँकांनी कजर्च न दिल्याने बाधितांना अखेर शासनाच्या तुटपुंज्या मानधनावर समाधान मानावे लागत आह़ेजिल्ह्यात साधारण तीन हजार 600 एचआयव्हीबाधित असल्याची नोंद आह़े गैरसमजामुळे बदनाम झालेल्या या एचआयव्ही पॉङिाटिव्ह रूग्णांना त्यांचे आप्तेष्ट, नातलग तसेच समाज आपलसं करत नाहीत़ अशात खचलेल्या रूग्णांना आधार देण्याचे काम काही स्वयंसेवी संस्थांमार्फत 2009 पासून सुरू करण्यात आले होत़े यासाठी जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेने पुढाकार घेतला होता़ यातून तब्बल 9 बचत गटांची निर्मिती करण्यात आली होती़ यात प्रामुख्याने महिलांचा समावेश होता़ ग्रामीण आणि शहरी भागातील या महिला एकमेकांना ओळखत नसल्या तरी या गटाच्या माध्यमातून त्या एकत्र आल्या होत्या़ यासाठी विहान संस्थेच्या आशा माळी यांनी तीन राष्ट्रीयकृत बँकांकडे खाद्यपदार्थ तयार करण्यासह विविध लघुउद्योग उभारण्यासाठी कर्ज पुरवठय़ाची मागणी केली होती़ बँकांनी या कजर्मागणीला वेळोवेळी कागदपत्र आणि नियमांची कात्री लावत प्रकरणे रखडत ठेवली होती़ तब्बल 300 महिलांचा समावेश असलेल्या या 9 गटांना पुढल्या वर्षी कर्ज देणार असे सांगून बँका प्रकरण रेटत होत्या़ एड्स नियंत्रण संस्थेकडून याबाबत पाठपुरावा करूनही दाद दिली जात नव्हती अखेर 2016 पासून बँकांनी कजर्च न दिल्याने सर्व बचत गट बंद करण्यात आले आहेत़ यामुळे एचआयव्ही-एड्सबाधित रूग्ण हे हलाखीचे जीवन जगण्यास बाध्य झाले आहेत़
एचआयव्हीबाधितांचे बचत गट पडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 1:01 PM