सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने दुधाळे ता. नंदुरबार येथे शनिवारी बैठक घेण्यात आली. त्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी लीलाबाई वळवी यांनी ४० ते ४५ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर देशभरातील हजारो शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने तीन कृषी विधेयक लोकसभेत मंजूर करून शेतकऱ्यांच्या विरुद्ध कूटनीती रचल्याच्या आरोप त्यांनी केला. विक्रम गावित यांनी संघटनेच्या माध्यमातून आता आंदोलनाची धार तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमात केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी विधेयकांच्या प्रतींची सामूहिक होळी करण्यात आली. यावेळी जमुनाबाई ठाकरे, घबीबाई वळवी, सुमित्रा कुरेशी करणसिंग कोकणी, विक्रम गावित, विजय सूर्यवंशी, मनोहर वळवी,कथ्थू भिल, राजेश वळवी, चिंतामण पाडवी, मंगल वळवी, बकाराम वळवी, तिसू वळवी,जेरमा वळवी, कृष्णा वळवी, धरम गायकवाड, काशिनाथ कोकणी आदी उपस्थित होते.
सत्यशोधक शेतकरी व ग्रामीण सभेकडून कृषी विधेयकाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:28 AM