लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कृषी क्षेत्रात उत्कृष्ट प्रयोग करणाºया शेतकऱ्यांच्या गौरवासह विविध उपक्रम कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या सभागृहात कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद कृषी विभाग, आत्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे आयोजित कृषी दिन कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अॅड. सीमा वळवी यांच्या हस्ते करण्यात आले .याप्रसंगी उपाध्यक्ष अॅड. राम रघुवंशी, बांधकाम सभापती अभिजीत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक एन.बी. भागेश्वर, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे आदी उपस्थित होते.सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमात जिल्ह्यात बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या ज्या लाभार्थ्यांनी लाभ घेऊन यशस्वीरित्या पूर्ण केले त्या १० शेतकºयांचा प्रमाणपत्र पुष्प व सॅनिटायझर देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.अॅड.सीमा वळवी, राम रघुवंशी, अभिजीत पाटील, विनय गौडा यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रदीप लाटे, सूत्रसंचालन एन. बी. सूर्यवंशी यांनी तर आभार अनील कांगणे यांनी मानले.
कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 12:25 PM