शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

शहरात साडेपाच तास भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 9:55 AM

ग्रामिण भागातही जनता हैराण : अनेक घटकांवार परिणाम, पिकांनाही फटका

ठळक मुद्देकजर्माफीचे अर्ज भरण्यासाठीही त्रासदायक.. सध्या शेतकरी कजर्माफीसाठी ग्रामिण भागात महाईसेवा केंद्र, आपले सरकार व इतर ठिकाणी कजर्माफीचे अर्ज भरण्यासाठी गर्दी होत आहे. अवघे तीन दिवस शिल्लक असल्यामुळे अनेक ठिकाणी रांगा लागत आहेत. अशा वेळीच वीज पुरवठा खंडित होत

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरासह जिल्ह्यात भारनियमनाचा जाच सुरू झाला आहे. ऐन भाद्रपद हिटमध्येच नागरिकांना विजेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहरी भागात किमान तीन ते साडेपाच तास भारनियमन केले जात आहे. एकाच वेळी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात भारनियमन न करता दिवसातून दोन टप्प्यात ते केले जात आहे. दरम्यान, ग्रामिण भागात पाच ते 11 तास भारनियमन सुरू असून यामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वीज वितरण कंपनीने गेल्या वर्षभरात भारनियमन जवळपास बंदच केले होते. ग्रामिण भागात मात्र पाच ते सात तास भारनियमन काही फिडरवरून सुरू होते. आता मात्र, विजेचा तुटवडा जाणवू लागल्याने आणि मागणी तसा पुरवठा होत नसल्यामुळे शहरीसह ग्रामिण भागातही मोठय़ा प्रमाणावर वीज भारनियमन सुरू करण्यात आले आहे. कुठलीही पूर्वसुचना न देता हे भारनियमन गेल्या तीन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. शहरी भागात साडेपाच तासनंदुरबार शहरात एकुण आठ फिडर आहेत. त्यातील वीज चोरी आणि गळतीचे प्रमाण शिवाय वीज बील वसुलीचे प्रमाण याचा सरासरी विचार करून या फिडरांना ए.बी.सी. व डी. अशा कॅटेगरीत विभागण्यात आले आहे. नंदुरबारात ए. कॅटेगरीमध्ये एकही फिडर नाही तर बी. कॅटेगरीमध्ये एक, सी. मध्ये पाच तर डी. मध्ये दोन फिडर आहेत. यानुसार बी फिडरमध्ये किमान तीन तास भारनियमन केले जात आहे. सी कॅटेगरीमधील फिडरवरून पावणेचार तास तर डी कॅटेगरीमधील फिडरमधून साडेपाच तास वीज पुरवठा खंडित केला जात आहे. एकाच वेळी भारनियमन न करता सकाळ व दुपार अशा दोन भागात भारनियमन केले जात आहे. त्यामुळे थोडाफार दिलासा मिळाला असला तरी डी कॅटेगरीच्या फिडरमधील नागरिकांना साडेपाच तास भारनियमनाच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे.ग्रामिण भागातही..ग्रामिण भागात देखील गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर भारनियमन केले जात आहे. किमान पाच व जास्तीत जास्त 11 तासांचे भारनियमन ग्रामिण भागात सहन करावे लागत आहे. अनेक भागात पावसाने ताण दिला आहे. त्यामुळे शेतक:यांना विहिर, कुपनलिकांद्वारे पाणी द्यावे लागत आहे. अशा वेळी वीजपुरवठा राहत नसल्यामुळे पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता  आहे. अनेक समस्यागेल्या वर्ष, दिड वर्षापासून शहरी भागात भारनियमन केले जात नव्हते. त्यामुळे अनेकांच्या इन्व्हर्टचा उपयोग होत नसल्यामुळे ते बंद किंवा बॅटरी डिस्चार्ज अवस्थेत होत्या. आता अचानक भारनियमन सुरू केल्यामुळे नादुरूस्त इन्व्हर्टर आणि बॅटरीमुळे अनेकांना अंधारात राहावे लागत आहे. विशेषत: शासकीय कार्यालयांमधील अशा प्रकारची स्थिती दिसून येत  आहे.वीज वितरण कंपनीच्या बसस्थानकासमोरील कार्यालयात बुधवारी दुपारी दोन ते चार वाजेच्या सुमारास विजेअभावी कर्मचा:यांना अंधारात काम करावे लागत असल्याचे चित्र होते. अशीच स्थिती इतर शासकीय कार्यालयांची होती. संगणकांची बॅटरी बॅकअप देखील कमी राहत असल्यामुळे कामकाजही ठप्प होत आहे. काही कार्यालयांमध्ये डिङोल जनरेटर असले तरी सध्या डिङोलचे भाव देखील वाढल्याने ते घेण्यासाठी तेवढी शासकीय तरतूद होत नसल्यामुळे अशा जनरेटरचाही फायदा होत नसल्याची स्थिती     आहे. ग्रामिण भागातील लहान, मोठय़ा उद्योगांना या भारनियमनाचा फटका बसत आहे.