लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गॅस लिकेज झाल्याने लागलेल्या आगीत घर जळून खाक झाल्याची घटना नंदुरबारातील देसाईपुरा भागात शनिवारी सायंकाळी घडली. दरम्यान, नागरिकांनी मदतकार्य करून आगीवर नियंत्रण मिळविले.देसाईपुरा भागात विजय प्रकाश चौधरी यांच्या मालकीचे घर आहे. हे घर त्यांनी भाडय़ाने दिले आहे. भाडेकरू बाहेर गेले असता अचानक गॅस लिकेज झाला. सायंकाळी घरातील महिला आली असता दिवाबत्तीसाठी त्यांनी काडीपेटी पेटवताच सिलिंडरने लागलीच पेट घेतला. क्षणार्धात सिलिंडर उंच उडून छताला ठोकला गेला. महिला वेळीच बाहेर निघाल्याने जीवीत हाणी झाली नाही. आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. परिणामी घरातील सर्व सामान जळून खाक झाला. स्थानिक नागरिकांनी मिळेल त्या साधनांनी आगीवर नियंत्रण मिळविले. पालिकेचा अगिAशमन बंब देखील लागलीच घटनास्थळी दाखल झाला. परंतु अरुंद गल्ली असल्यामुळे अडथळे येत होते. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेवून बंदोबस्त ठेवला. रात्री उशीरार्पयत पोलिसातत अगिAउपद्रवान्वये नोंद करण्याचे काम सुरू होते.प्रकाशा येथे घरातत साठवलेला कापूस जळालाजिल्हा परिषद सदस्य रामचंद्र पाटील यांच्या नवीन घरात साठवलेला कापसाला लागलेल्या आगीत 15 ते 20 क्विंटल कापूस जळून खाक झाला. दरम्यान, ग्रामस्थांनी लागलीच मदतकार्य केल्याने सुमारे सव्वाशे क्विंटल आगीपासून वाचला.सकाळी 11 वाजता घरातून धूर निघत असल्याचे काही जणांच्या लक्षात आले. तातडीने लागलीच कापूस काढण्यास सुरुवात करण्यात आली. ग्रामस्थांनी देखील धाव घेतली. या ठिकाणी तब्बल दीडशे क्विंटल कापूस ठेवण्यात आला होता. आगीने रौद्र रूप धारण केले असते तर मोठा अनर्थ झाला असता. परंतु ग्रामस्थांच्या मदतीने ट्रॅक्टर लावून लागलीच कापूस घरातून काढण्यात आला. आगीत 15 ते 20 क्विंटल कापूस जळाल्याचे सांगण्यात आले. प्रकाशाचे मंडलाधिकारी बी.ओ.पाटील व तलाठी डी.एम.चौधरी यांनी पाहणी करून सदर माहिती तहसीलदार यांना दिली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. उशीरार्पयत पोलिसात नोंद झाली नव्हती.
नंदुरबारात गॅस लिकेजमुळे घर जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 1:04 PM