लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी अधिकाधिक निदरेष करण्याच्या दृष्टीने विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. यांतर्गत 15 मे 2018 पासून मतदार केंद्रस्तरीय अधिकारी हे घरोघरी भेटी देत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.भेटी दरम्यान 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदारांची माहिती घेवून यादी तयार करण्यात येणार आहे. या मतदारांकडून 1 जानेवारी 2018 रोजी जो मतदार म्हणून नोंदणीस पात्र आहे परंतु त्यांची नोंद न झाल्याने या मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे आणि 1 जानेवारी 2019 ला मतदार म्हणून नोंदणीस पात्र होणा:या व्यक्तीची माहिती घेवून 1 सप्टेंबर 2018 पासून नोंदणी या मोहिमेत करण्यात येणार आहे. तसेच दुबार नोंदी, मयत किंवा कायमस्वरूपी स्थलांतरीत व्यक्ती यांची माहिती घेण्यात येवून पूर्वीच्या नोंदीची दुरूस्ती करण्यात येणार आहे. याकामी घरोघरी येणा:या अधिका:यांना आवश्यक माहिती बिनचुक द्यावी.मतदार नोंदणी माहिती तंत्रज्ञानाच्या वापरातून सुलभ व जलद करण्यासाठी आयोगाने एफड-ठी3 प्रणालीचा वापर 16 मे 2018 पासून सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व देशातील मतदार नोंदणी अधिकारी जोडले जाणार असून, त्यांच्या नोंदणी विषयक कामाची माहिती आयोगास तत्क्षणी होणार आहे. याकामी सर्व इछड-ठी3, एफड-ठी3 या प्रणालीचा वापराबाबत प्रशिक्षण सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहा मतदार नोंदणी अधिकारी यांना देण्यात आलेले आहे. या पुनर्निरक्षण कार्यक्रम 1 सप्टेंबर 2018 ला सुरू होईल. या वेळी प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या मतदार यादीचे शुद्धीकरण पूर्ण करण्यात येईल. मतदार छायाचित्र ओळखपत्रावर जुन्या 16 आकडी क्रमांका ऐवजी नवीन 10 आकडी क्रमांक देण्याच्या कामास वेग देवून ते 31 ऑगस्ट 2018 पूर्वी न चुकता पूर्ण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत मतदार यादीमध्ये वंचित राहिलेल्या मतदारांनी व 1 जानेवारी 2018 रोजी 18 वर्ष पूर्ण होणा:या पात्र मतदारांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी व 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण होणार आहे अशा भावी मतदारांनी माहिती भरून देण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी केले आहे.
मतदार अधिका-यांची घरोघरी भेट : नोंदणी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 12:56 PM