शहादा : आपली सूतगिरणी ही शेतक:यांच्या हिमतीवर चालणारी संस्था आहे. शेतकरी हितालाच प्राधान्य देणारी असल्याने शेतक:यांनी पिकवलेला पूर्णच्या पूर्ण कापूस गिरणीत टाकला पाहिजे, असे प्रतिपादन लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन दीपक पाटील यांनी शनिवारी कापूस खरेदी शुभारंभप्रसंगी केले. यंदा गिरणीतर्फे कापसाला प्रतवारीनुसार साडेपाच हजारापासून ते सहा हजार रुपयांर्पयत प्रती क्विंटलचा भाव त्यांनी जाहीर केला.लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणीचा 2018-19 हंगामासाठीचा कापूस खरेदी शुभारंभ शनिवारपासून करण्यात आला. गिरणीचे चेअरमन दीपक पाटील यांचा वाढदिवस असल्याने कार्यक्रमापूर्वी दीपक पाटील यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले. विविध संस्थांतर्फे दीपक पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी सभासदांना मार्गदर्शन करताना दीपक पाटील म्हणाले की, परिसरातील शेतक:यांच्या शेतमालास भाव मिळावा, शेतक:यांना स्वाभिमानाने जगता यावे म्हणून स्व.पी.के. अण्णांनी गिरणी सुरू केली होती. सूतगिरणी आपल्या हक्काची संस्था आहे. येथे सभासद आणि शेतक:यांच्या हिताला प्राधान्य असून सभासदांची पिळवणूक, फसवणूक होणार नाही हा विश्वास सभासदांनी ठेवावा. गिरणीचा संपूर्ण व्यवहार पारदर्शक असून कोणीही भूलथापांना बळी पडू नये. गिरणीचे 13 हजार सभासद असताना केवळ 1300 सभासद कापूस टाकतात हे योग्य नाही. सर्वानी सहकार्य केले पाहिजे. गिरणीमुळेच आपली ओळख असून गिरणी चालली पाहिजे यासाठी सभासदांनी पिकवलेला संपूर्ण कापूस गिरणीतच विक्री करण्याचे आवाहन त्यांनी केले. यंदा गिरणीतर्फे कापसाला ग्रेडनुसार प्रती क्विंटल साडेपाच ते सहा हजार रुपये भाव देण्याचे दीपक पाटील यांनी जाहीर केले.सूत्रसंचालन के.डी. पाटील यांनी केले. कार्यक्रमास कमलताई पाटील, जयश्री पाटील, मकरंद पाटील, माधवी पाटील, पं.स.चे माजी सभापती माधव पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, उपसभापती रवींद्र रावल, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, व्हा.चेअरमन जगदीश पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रेमसिंग अहेर, कार्यकारी संचालक पी.आर. पाटील, सूतगिरणीचे व्हा.चेअरमन रोहिदास पाटील, कार्यकारी संचालक आर.डी. पाटील, पं.स. सभापती दरबारसिंग पवार, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, प्रा.संजय जाधव, अरविंद कुवर, रमेश जैन, गिरणीचे सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी व सभासद शेतकरी उपस्थित होते.रक्तदान शिबिरासह विविध उपक्रमदीपक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सूतगिरणीत रक्तदान शिबिराचे तर खरेदी-विक्री संघात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात खान्देशस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली.
कापसाला सहा हजाराचा भाव जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:49 PM