लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : येथे दोघा भुरटय़ांनी पॉलिशच्या बहाण्याने एक लाख 65 हजाराचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली़ प्रकाशा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या स्मिता राजेंद्र पेटकर यांच्या घरी गुरूवारी सकाळी अज्ञात दोन व्यक्तींनी येऊन भांडे व दागिने पॉलिश करून देतो असे सांगत दोघांनी प्रवेश केला. त्या दोघांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत स्मिता पेटकर यांनी शेजारी राहणा:या पूनम काशिनाथ गुरव यांनाही बोलावून घेतल़े दोघा भामटय़ांच्या भूलथापांना बळी पडून स्मिता पेटकर यांनी त्यांच्या एक लाख 20 हजार रूपयांच्या 40 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन पोत तर पूनम गुरव यांनी त्यांची 15 ग्रॅम वजनाची 45 हजार रूपये किमतीची सोन्याची पोत दोघांच्या ताब्यात दिली़ हे दागिने मिळाल्यानंतर दोघांनी वेळोवेळी पाणी गरम करून आणा, हळद आणा अशा सूचना करत, महिलांना व्यस्त ठेवल़े याचदरम्यान मीठ व गेरू आणा अशा सूचना करून महिला घराच्या आत गेल्याचे पाहून दोघांनी दागिने घेत घरातून पोबारा केला़ परिसरातील नागरिकांनी धाव घेत चोरटय़ांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला़ मात्र चोरटे मिळून आले नाहीत़ शहादा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
पॉलिशच्या बहाण्याने दीड लाखांचे दागीने प्रकाशात लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 12:06 PM