नंदुरबार : जिल्ह्यात कांद्याची आवक मोठय़ा प्रमाणात वाढल्याने निर्यात मुल्य घसरले आह़े त्यामुळे नंदुरबार येथील बाजार समितीत शेकडो क्विंटल कांदा पडून आह़े भाव नसल्याने मालाला उठाव नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत़ गुरुवारी नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 6 ते 7 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती़जिल्ह्यासह देशभरात कांद्याचे भाव गडगडले आहेत़ यंदा आवक वाढल्याने साहजिकच कांद्याच्या निर्यात मुल्यात घट झालेली आह़े त्यामुळे शेकडो क्विंटल कांदा बाजार समितीत अक्षरश: सडत असल्याचे चित्र दिसून येत आह़े सध्या नंदुरबार येथील बाजारपेठेत दररोज 6 ते 7 हजार क्विंटल कांदा आवक सुरु आह़े त्या तुलनेत मालाला उठाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत़ नंदुरबारात 2 रुपयांपासून ते 7 रुपये किलो दराने होलसेल भावात कांद्याची विक्री केली जात आह़े लाल कांद्याची बिकट स्थिती असताना पांढ:या कांद्याला मात्र 8 ते 9 रुपये किलो भाव मिळत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितल़े भाव मिळण्याच्या प्रतीक्षेमुळे अनेक कांदा उत्पादक शेतक:यांनी कांदा साठवणुकीला महत्व दिले होत़े परंतु साठवणुक करुनही योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतक:यांना कांदा विक्रीसाठी काढावा लागला आह़े दरम्यान, गेल्या आठवडय़ापासून जिल्ह्यात साक्री येथून कांद्याची मोठय़ा प्रमाणात आवक वाढली आह़े त्यामुळे बाजार समिती आवारात कांद्याने भरलेली शेकडो वाहने उभी असल्याचे चित्र दिसून येत आह़े
भावाअभावी शेकडो क्विंटल कांदा पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:13 PM