लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दोन्हीही मुलीच झाल्या तसेच माहेरून ४० हजार रुपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करून फारकत झालेली नसतांना दुसरी पत्नी केल्याप्रकरणी नंदुरबार येथील दोन जणांविरुद्ध दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या पत्नीशी २५ वर्ष संसार केला आहे.पोलीस सूत्रांनुसार, मुंबई येथील राहणारी व नंदुरबार येथील नागाईनगर भागात सासर असलेल्या सिमा रामदास राऊत या महिलेचा १९९५ मध्ये रामदास राऊत यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांना दोन मुली झाल्या. मुलगा झाला नाही म्हणून सिमा यांना त्रास सुरू झाला. याशिवाय माहेरून ४० हजार रुपये आणावे अशी मागणी होऊ लागली. चारित्र्याचाही संशय घेतला जाऊ लागला. हा सर्व त्रास सिमाबार्ई सहन करत होत्या.याच दरम्यान रामदास राऊत यांनी सिमाबाई यांच्याशी कायदेशीर फारकत झालेली नसतांना निर्मलाबाई या महिलेशी विवाह केला.वारंवारचा त्रास आणि सवत आणली म्हणून सिमाबाई यांनी नंदुरबार उपनगर पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून रामदास काळू राऊत आणि निर्मलाबाई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक धनराज निळे करीत आहे. संशयीतास अद्याप ताब्यात घेण्यात आले नसल्याची माहिती तपासाधिकारी निळे यांनी दिली.
दोन्ही मुलीच झाल्याने पतीचा दुसरा घरोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 12:36 PM