शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
2
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
3
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
4
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
5
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
6
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
7
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
8
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
9
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
10
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
12
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
13
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
14
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
15
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
16
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
17
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
18
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
19
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
20
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान

दलित, आदिवासी, ओबीसी यांच्या आरक्षणाचा मी चौकीदार! जिवंत आहोत तोपर्यंत...: पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 6:48 AM

पंतप्रधान मोदी यांची शुक्रवारी भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली.

- रमाकांत पाटीललोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : देशातील दलित, आदिवासी, ओबीसींचे आरक्षण धर्माच्या आधारावर विभागणी करण्याचे काँग्रेसचे कारस्थान असून, त्याचे कर्नाटक मॉडेल देशात राबविण्याचा अजेंडा आहे; मात्र, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते आपण होऊ देणार नाही. आरक्षणासाठी दलित, आदिवासी आणि ओबीसींचा चौकीदार म्हणून आपण काम करणार असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली.   

पंतप्रधान मोदी यांची शुक्रवारी भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल भाईदास पाटील, आमदार अमरीशभाई पटेल, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यासह धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. 

‘आस्था मिटविण्याचे काँग्रेसचे षडयंत्र’मोदी यांनी यावेळी काँग्रेसला लक्ष्य केले. ते म्हणाले, काँग्रेस वेगवेगळ्या अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करीत आहे. हे लोक मोदींच्या विकासाशी सामना करूच शकत नाहीत. त्यामुळे त्यांना खोटा प्रचार करून मते मागावी लागत आहेत. सॅम पित्रोदा यांचे नाव न घेता ते म्हणाले, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे गुरू देशातील जनतेला वर्णभेदाच्या नावावर विभागू पाहत आहेत. खरे म्हणजे ज्यांचा रंग भगवान श्रीकृष्णासारखा आहे अशा कृष्णवर्णीय लोकांना ते आाफ्रिकन मानतात. अर्थात यातून ते आदिवासींचाही अपमान करीत आहेत. रामाच्या देशात राम मंदिर निर्माण आणि राम मंदिराचा उत्सव हे लोक देशद्रोह मानतात. काँग्रेस देशातून हिंदूंची आस्था मिटविण्याचे षडयंत्र करीत आहे. हे त्यांचे स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाnandurbar-pcनंदुरबार