लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मयत व्यक्तीच्या नावावर घरकूल मंजूर तर ज्यांचे घरकूल मंजूर झाले आहे त्यांच्या आय.डी. क्रमांकावर दुस:याचेच नाव यासह इतर चुकांमुळे तालुक्यातील तलावडी येथील संतप्त लाभार्थीनी गुरुवारी पंचायत समितीच्या गटविकास अधिका:यांना घेराव घातला.शहादा तालुक्यात 2011 च्या जनगणनेनुसार पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थीना घरकूल मंजूर झाले आहेत. लाभार्थीना त्याबाबत आय.डी. क्रमांक देण्यात आला आहे. मात्र तलावडी येथील लाभार्थीचा आय.डी. क्रमांकावर दुसरीच नावे येतात. लाभार्थी व आय.डी. क्रमांकात तफावत आढळून येत असल्याने लाभार्थी संतप्त झाले आहेत. तलावडी येथील काही लाभार्थीना घरकूल योजनेच्या पहिल्या हप्त्याचे धनादेश मिळाले तर काहींना मिळालेले नाहीत. काही जणांचे घरकूल तयार झाले आहे, त्यांना निधीही मिळाला आहे तरीही त्याच नावाने पुन्हा घरकूल मंजूर झाले. यासह अनेक चुका असल्याने 132 संतप्त लाभार्थीनी थेट पंचायत समितीत येऊन गटविकास अधिकारी श्रीराम कागणे यांना घेराव घालून त्याबाबत विचारणा केली व न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली.या वेळी लाभार्थीपैकी पंडित पावरा, बन्सीलाल पावरा, करसन पावरा, दिनेश पावरा, सुभाष पावरा, अशोक पावरा, मेहरसिंग पावरा, उत्तम पावरा, जितेंद्र पावरा, शेकलाल पावरा, मेह:या पावरा, एकलाल पावरा, मिनसिंग पावरा व इतर लाभार्थीनी गटविकास अधिका:यांशी चर्चा केली. लाभार्थीना दिलेला आय.डी. क्रमांकावर दुस:याचे नाव येणे, अनुदानाचा धनादेश न मिळणे, ग्रामसेवकाने लाभार्थीची नावे टाकताना मूळ नाव न टाकल्याने हा गोंधळ झाल्याचे लाभार्थीनी निदर्शनास आणून दिले. याबाबत ग्रामसेवकाकडे माहिती मागितली तर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात, असेही या वेळी लाभार्थीनी सांगितले.तलावडी गावात नव्याने राहणा:या रहिवाशांकडून ग्रामपंचायत कर वसूल करून त्यांची नावे पहिल्याच यादीत टाकून घरकूल मंजूर केल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला.
आय.डी. क्रमांकाच्या तफावतीमुळे लाभार्थी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 1:06 PM