मध्यप्रदेशातून मोठय़ा प्रमाणात अवैधरित्या जनावरे घेऊन जाणारा ट्रक सिमेलगत असलेल्या नंदुरबारच्या हद्दीत पकडण्यात आला़ यात, 65 गोवंशची सुटका करण्यात आली. शनिवारी-रविवारी मध्यरात्रही ही बाब उघड झाली़ मध्य प्रदेश पोलिसांकडूनही ही कार्यवाही करण्यात आली़ याबाबत सविस्तर वृत्त असे की, राजस्थान येथून महाराष्ट्रात घेऊन जात असलेल्या जनावरांनी भरलेला ट्रक (क्ऱआर.ज़े 09 जी.सी. 7377) यास निवाली आरटीओ नाक्यावर थाबविण्यात आल़े परंतु ट्रक चालकाने चित्रपटात शोभावे अशा प्रकारे अडथळा म्हणून लावण्यात आलेले बॅरिकेट्स तोडत सुसाट वेगाने पळ काढला़ काही तरी गडबड असल्याचे लक्षात आल्यावर निवाली पोलिसांनी त्वरित पानसेमल पोलिसांना संपर्क करून सदर ट्रकची माहिती दिली़ या माहितीच्या आधारे पानसेमल पोलिसांनी बंदोबस्त लावून सर्व वाहनाची चौकशी सुरू केली़ नाकाबंदी करुन पोलिसांनी संबंधित ट्रक पकडला़ तपासणी केली असता त्यात लाकडाचे दोन पार्टीशन करून जनावरे कोंबून भरलेली आढळली़ त्यात 17 गाई, 49 बैल जीवंत होते तर, एक बैल मात्र मृत अवस्थेत आढळला़ जनावरांची सुटका करुन त्यांना श्रीकृष्ण गो शाळेत सोडण्यात आल़े गोवंशाची अवैध तस्करी प्रकरणी चाँद मोहम्मद व सादीक खान यांना अटक करण्यात आली आह़े खेतिया येथे दर शनिवारी आठवडे बाजार भरत असल्याने अशा प्रकारे अवैध वाहतूक नेहमी होत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आल़े खेतियाकडे जाणा:या वाहनांची पोलीस प्रशासनाकडून बारकाईने तपासणी करण्यात येत होती़ त्यांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
खेतिया नजीक जनावरांची अवैधरित्या वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 11:27 AM