लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 24 : तालुका पशुसंवर्धन विभागाकडून दिघीआंबा येथे 601 पाळीव जनावरांचे लसीकरण करण्यात आल़े कामधेनू दत्तक ग्राम योजनेंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला़ अध्यक्षस्थानी रायसिंगपूरचे सरपंच तस्वीर पाडवी तर प्रमुख अतिथी म्हणून याहा मोगी पशुपालक मंडळाचे अध्यक्ष रविंद्र कोटय़ा नाईक, अशोक सुभाष वसावे, शंकर जेमू पाडवी, देविदास कोथा पाडवी उपस्थित होत़े कार्यक्रमात पशुपालकांना क्षार मित्र आणि दशरथ गवताचे ठोंबे वाटप करण्यात आल़े प्रसंगी डॉ़ सुजीत कोलगंथ यांनी शासनाच्या नकुल कार्ड व राष्ट्रीय गोवर्ग उत्पादकता मिशन कार्यक्रम याची माहिती दिली़ यात शेतक:यांना प्रशिक्षण देण्यात आल़े यानंतर दुग्ध व बैलजोडी स्पर्धा घेण्यात आली़ यात बैल स्पर्धेत अनिल कोठा पाडवी, अजरुन फत्तू नाईक, वसंत राया पाडवी यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय तर दुग्ध स्पर्धेत अशोक सुभाष वसावे, शंकर जेमू पाडवी विक्रम जहामू वळवी यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देण्यात आल़े कार्यक्रमात डॉ़ प्रशांत खटके यांनी कुक्कुटपालन या विषयावर मार्गदर्शन केल़े सूत्रसंचालन डॉ़ योगेश दुबे यांनी तर आभार डॉ़ बाळासाहेब मोतीपवळे यांनी मानल़े कार्यक्रम यशस्वीतेसाठी गौतम भामरे, दित्या हु:या वळवी, राजेंद्र वळवी, नरेंद्र सोनवणे, नानाभाऊ माळी, बाळासाहेब पवार, आऱएस़ फुलपगारे यांनी परिश्रम घेतल़े
अक्कलकुव्यातील दिघीआंबा येथे 601 जनावरांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:52 PM