शहादा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी 57 मूकमोर्चे काढून शासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी पुन्हा आंदोलन सुरू झाले असून मंगळवारी शहादा तालुका सकल मराठा समाजातर्फे शहादा शहर बंद ठेवण्यात आले. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. सोमवारी कायगाव टोका, ता.गंगापूर येथील काकासाहेब दत्तात्रय शिंदे (28) या युवकाने जलसमाधी घेतल्यानंतर राज्यात या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. मंगळवारी सकाळी शहादा तालुका सकल मराठा समाजाच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यानी एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला. या वेळी श्याम जाधव, अनिल भामरे, भूषण पीटील, प्रा.दत्तात्रय शिंदे, देवा बोराणे, विजय कदम, देवा बोरसे, शशिकांत पाटील, दीपक पाटील, अॅड.सरजू पाटील, एन.डी. पाटील, भरत पाटील, मनोज सैंदाणे, अशोक सैंदाणे, डॉ.दीपक मोरे, राकेश सैंदाणे, देवेंद्र बोरसे, कौस्तुभ मोरे, स्वप्नील पाटील, भटू पाटील, आर.आर. बोरसे, रमेश बोराणे, अशोक शिंदे, संजू सालमाटे, राकेश गुंजाळ, प्रवीण जाधव, दिनेश कोते, राहुल बोराणे, अशोक नवले, प्रशांत कदम, पुरुषोत्तम गुंजाळ, दगा मढवी, मनीष पवार, श्याम पाटील, गणेश पाटील, शरद पाटील प्रतीक सनेर, हर्षल पाटील, गणेश पाटील, उमेश पाटील, संतोष पाटील, उमाकांत पाटील, चंद्रकांत पाटील, तुषार पाटील, धर्मेद्र पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.राज्य शासनाने मराठा समाजासाठी जाहीर केलेल्या विविध शैक्षणिक सवलती विद्याथ्र्याना प्राप्त झालेल्या नाहीत. त्याबाबत सरकारकडून पाठपुरावाही करण्यात आलेला नाही. आरक्षण मिळावे यासाठी राज्यात ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येने 57 मूकमोर्चे शांततेत काढण्यात आले. मात्र त्याची दखल शासनाने घेतली नाही. या मागणीसाठी राज्यात पुन्हा आंदोलन सुरू झाले असून गेल्या आठवडय़ात गंगापूर तहसीलदारांना या आंदोलनाबाबत निवेदन देऊन जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला होता. प्रशासनाकडून निवेदनाची दखल न घेण्यात आल्याने कायगाव टोका, ता.गंगापूर येथील काकासाहेब दत्तात्रय शिंदे या आंदोलकाने नदीत उडी मारुन जलसमाधी घेतली. मराठा आरक्षणासाठी हा युवक पहिला बळी ठरला असून त्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. मात्र शासनाकडून कुठलेही पाऊल उचलले न गेल्याने शहादा तालुका सकल मराठा समाजाने या घटनेचा निषेध करून शहादा शहर बंदचे आवाहन केले होते. सकाळी काशीनाथभाई पाटील मार्केट, पुरुषोत्तम मार्केट, मेनरोड, जाधव मार्केट, बागूल मार्केट यासह शहरातील सर्वच व्यापा:यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली होती. समाजातर्फे नायब तहसीलदार डॉ.उल्हास देवरे यांना निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक संजय शुक्ल, ज्ञानेश्वर बडगुजर व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
शहाद्यात ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 1:12 PM