रमाकांत पाटील
नंदुरबार - मणिपूर घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला बंदमध्ये समुदाय, राजकीय पक्ष आणि सर्व संघटना विविध सेवा भावी संस्थांसह १५० च्या जवळपास संघटना सामील होत्या शासकीय कार्यालय अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यात संपूर्ण व्यवहार ठप्प होते दरम्यान शहादा येथे परिवर्धा ते तराडी दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी एसटी बसेसचा काचा फोडल्याची घटना घडली आहे.
मणिपूर येथील घटनेचा आंदोलकांनी तिव्र शब्दात निषेध व्यक्त करीत प्रांत अधिकारी सुभाष दळवी यांना निवेदन दिले जिल्ह्यात नंदुरबारशहादा तळोदा अक्कलकुवा नवापूर धडगाव या तालुक्यात सकाळपासूनच बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती ठिकठिकाणी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन राष्ट्रपुरुषांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मणिपूर येथील घटनेचा निषेध व्यक्त केला ग्रामीण भागातही बंद पाळण्यात आला
सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शहादा तालुक्यातील परिवर्धा ते त-हाडी दरम्यान काही अज्ञात व्यक्तीकडून एसटी बसच्या काचा फोडण्यात आल्या या पार्श्वभूमीवर शहादा आगारातून बस वाहतूक बंद करण्यात ठेवण्यात आली होती सकाळी नऊ वाजेच्या सुमारास विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे एकत्रितपणे जपून पुष्पहार अर्पण करून निषदाचे निवेदन दिले त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महात्मा फुले पुतळा यादरम्यान निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आली होती