प्रारंभी कोरोनाकाळात मृत्यू झालेले कोरोना योद्धा व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर गणेशपूजन व जलपूजन करण्यात आले. यानंतर मावळते अध्यक्ष ला. डाॅ. राजेश कोळी व फेमिना क्लब अध्यक्षा ला. डॉ. गायत्री पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. लायन्स फेमिनाचे सचिव मीनल म्हसावदकर यांनी गेल्या वर्षाच्या सेवाकार्याचा अहवाल सादर केला. यानंतर ला. नितीन बंग यांनी नूतन सदस्यांची ओळख करून दिली. ला. संजीव केसरवाणी यांनी अत्यंत अनोख्या पद्धतीने सर्व नूतन कार्यकारिणीचा शपथविधी केला व मार्गदर्शन केले. यानंतर नूतन अध्यक्ष ला. शेखर कोतवाल, फेमिना क्लब अध्यक्षा ला. हिना रघुवंशी व लायनेस क्लब अध्यक्षा सुप्रिया कोतवाल यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे चंद्रकांत रघुवंशी यांनी लायन्स परिवारातर्फे करीत असलेल्या सेवाकार्याचा गौरव केला. या कार्यक्रमात ला. राजेंद्र माहेश्वरी व ला. डॉ. तेजल चौधरी यांनी डिस्ट्रिक्टमध्ये विविधपदी निवड झाल्याबद्दल, तसेच अन्नदान प्रकल्पात सेवा देणाऱ्या ताई, रक्तदाते आदींचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, रेल्वेस्टेशन सुशोभीकरण करण्यासाठी क्लबतर्फे देण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याची फ्रेम मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आली.
लायन्स क्लब व लायन्स फेमिना क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 4:20 AM