शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

रोटरी क्लब नंदनगरीचा पदग्रहण समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:28 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रोटरी क्लब आॅफ नंदनगरीचा तिसरा पदग्रहण सोहळा येथे झाला. कार्यक्रमाची सुरुवात रोटरी प्रार्थनेने झाली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रोटरी क्लब आॅफ नंदनगरीचा तिसरा पदग्रहण सोहळा येथे झाला. कार्यक्रमाची सुरुवात रोटरी प्रार्थनेने झाली. या वेळी क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी शपथ देण्यात आली.कार्यक्रमास खासदार डॉ.हीना गावीत, रोटरीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर प्रशांत जानी, हेता जानी, श्रीकांत इंदाणी, अनिश शाह, रोटरी नंदनगरीचे नवनिर्वाचित अध्यक्ष नागसेन पेंढारकर, सचिव मनोज गायकवाड, माजी अध्यक्ष प्रीतीश बांगड आदी उपस्थित होते.या पदग्रहण समारंभात डिस्ट्रीक्ट गव्हर्नर प्रशांत जानी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष नागसेन पेंढारकर व सचिव मनोज गायकवाड यांना शपथ दिली. याप्रसंगी खासदार डॉ.हीना गावीत व जि.प.चे उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी यांना रोटरी क्लब नंदनगरीचे मानस सदस्यत्व प्रदान करण्यात आले. नवीन सदस्य म्हणून डॉ.गौरव तांबोळी, डॉ.स्वप्निल महाजन, प्रवीण पाटील, इकबाल शेख, आकाश चौधरी, दिक्षांत सारडा, अब्बास काटावाला, राकेश आव्हाड, जुझर बोहरी यांना रोटरी पिन लावून रोटरी क्लब नंदनगरीमध्ये समाविष्ट करण्यात आले. प्रशांत जानी, श्रीकांत इंदाणी, प्रीतीश बांगड, नागसेन पेंढारकर यांनीही मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाअंतर्गत शहरातील नवनिर्माण संस्था, अस्तित्व फाऊंडेशन, श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशन, जमीअत उलमा ऐ हिन्द या संस्थांचा तसेच रोटरी नंदनगरीच्या सदस्यांच्या कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आॅनलाईन गीतगायन स्पर्धा व्हॉईस आॅफ नंदुरबार या स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम रागिणी शिंदे, द्वितीय पार्थ घासकडबी, तृतीय महिमा वळवी तर उत्तेजनार्थ म्हणून दीपक जाधव, रोहिणी पिंपळे, केतकी गोहील यांना पारितोषिक वितरीत करण्यात आले. कार्यक्रमात कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता सर्व खबरदारी घेण्यात आली होती.कार्यक्रमात मिटिंग कॉल टू आॅर्डर अनिल शर्मा यांनी तर फोर वे टेस्ट आकाश जैन यांनी म्हटले. सूत्रसंचालन किरण दाभाडे तर आभार सचिव मनोज गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमासाठी युवराज पाटील, मनीष बाफना, दिनेश साळुंखे, रमाकांत पाटील, हाकिम लोखंडवाला, विवेक जैन, हर्षल पाटील, मुर्तुझा वोरा, इसरार सैयद, फकरुद्दीन जलगुणवाला, प्रवीण येवले, सॅमूवेल लवणे, अ‍ॅड.प्रेमानंद इंद्रजित, विनोद जैन, अपूर्व पटेल, महेंद्र झंवर, रवी नानकानी, दीपक सेवाणी, विजय मंगलानी, अभिजित जाधव यांच्यासह रोटरी क्लब आॅफ नंदनगरीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.