लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : नर्मदा विकास प्रकल्पांतर्गत नागरी सुविधा दुरुस्तीसाठी वाडी ता़ शहादा पुनर्वसन येथे काँक्रेटिकरण व रस्त्याचे भुमिपूजन माजी पालकमंत्री अॅड़ पद्माकर वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहादा उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत सातारकर आदी उपस्थित होते.नर्मदा विकास प्रकल्प नागरी सुविधा रस्ता दुरुस्तीअंतर्गत वाडी पुनर्वसन येथे काँक्रेटिकरण व रस्त्यासाठी 88 लाख मंजुर करण्यात आले आह़े गावांतर्गत साडेचार किलोमीटर रस्त्याचे भूमिपूजन अॅड़ वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी तहसीलदार खैरनार, गटविकास अधिकारी श्रीराम कागणे, तलाठी के.वाय़ कोकणी, ग्रामपंचायत सदस्य मंगेश पाटील, नर्मदा आंदोलनाच्या लतिका राजपूत, चेतन साळवे, सरपंच जेसा वसावे, उपसरपंच मनीषा गोसावी, ग्रामसेवक एम.के.पावरा, ग्रामपंचायत सदस्य रमेश पावरा, निमा पावरा, सुमा भिल, पुरशा भिल, गोरख पवार, केसरसिंग वसावे, सुनीता पावरा, पोलीस पाटील मानसिंग पावरा आदी उपस्थित होत़े या वेळी मार्गदर्शन करतांना अॅड़ पद्माकर वळवी म्हणाले की, रस्त्याच्या कामाला सुरू होण्याआधी प्रत्येक ग्रामस्थाने रस्त्याच्या बाजूला एक झाड लावावे, म्हणजे वृक्ष संवर्धन होईल. सोबतच ग्रामस्थांना सावली मिळेल, स्वयंपाकाकरिता सरपण उपलब्ध होईल. गावाचे सुशोभीकरण वाढेल व विकासात भर पडेल. असेही त्यांनी सांगितल़े शासनाच्या निधीचा वापर गावाचा विकासासाठी करावा असे आव्हान त्यांनी केल़े कार्यक्रमाचे सुत्रसंचालन के.वाय.कोकणी यांनी तर आभार ग्रामसेवक एम.के.पावरा यांनी मानले. यावेळी मोठय़ा संख्यने ग्रामस्थ उपस्थित होते.
वाडी येथे विकास कामांचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 1:09 PM