लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : नाफेडतर्फे शासकीय किमान आधारभूत किंमत योजना सन 2017-18 अंतर्गत सोमवारी किंमत समर्थन योजनेखाली हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जिल्हा उपनिबंधक वाय.एस. पुरी यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के. पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भरत पटेल, जिल्हा मार्केटींग कार्यालयाचे सुनील देशमुख, यशवंत देवराम पाटील, आनंदा पाटील, भाऊराव बोरसे, महेश वसावे, मिलिंद पवार, अजरुन अहिरे, अविनाश पाटील, चंद्रकांत मराठे व शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शासनाच्या वतीने हरभ:याला चार हजार 400 रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त शेतक:यांनी आपला माल शासनाच्या खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा असे आवाहन करण्यात आले.शेतक:यांनी माल कोरडा व चाळणी करूनच आणावा. माल विक्रीसाठी आणतांना शेतक:यांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी मुळ सातबारा उतारा, आधारकार्डची ङोरॉक्स, बँक पासबुकची ङोरॉक्स त्यावर आयएफएससी कोड असणे आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकरी सहकारी संघात संपर्क साधावा़
नंदुरबार बाजार समितीत हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:09 PM