लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : क्षत्रिय मराठा समाज परिवर्तन चळवळीच्या कार्यालयाचे शहादा येथे उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयाकडून समाजातील विद्याथ्र्याना शिक्षणविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.शहरातील सप्तशृंगी माता मंदिराजवळील बोराणे कॉम्प्लेक्समध्ये या कार्यालयाचे उद्घाटन परिवर्तन चळवळीचे अध्यक्ष शिरीष जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. मराठा समाजातील विविध सामाजिक प्रश्न, शैक्षणिक समस्या व धोरणात्मक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हे कार्यालय उघडण्यात आले आहे. समाजातील विद्याथ्र्याना विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी मार्गदर्शन, विविध विद्यापीठांकडून माहिती प्राप्त करून विद्याथ्र्याना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचा फायदा विद्याथ्र्यानी घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. भविष्यात या कार्यालयाची व्याप्ती वाढविण्यात येणार असून तळोदा व नंदुरबार येथेही कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. कार्यक्रमास परिवर्तन चळवळीचे समन्वयक विठ्ठल मराठे, प्रा.डॉ.रवींद्र कदम, नंदराव कोते, धनराज पाचोरे, सुनील पवार, वामनराव चव्हाण, देवदत्त बोराणे, विजय कदम आदी उपस्थित होते.
मराठा परिवर्तन चळवळीच्या कार्यालयाचे शहाद्यात उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:14 PM