ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी येथे सुसरी नदीपात्रात जलमंदिराचे उद्घाटनासह कै.नरोत्तम मंगेश पाटील फाऊंडेशनचे फलक अनावरण, रक्तदान शिबिर, गुणवंत विद्याथ्र्याचा गौरव, वृक्षरोपण व परिसरातील जलमंदिरासाठी काम करणा:यांचा सत्कार करण्यात आला.ब्राrाणपुरी येथील स्व.नरोत्तम मंगेश पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मंगळवारी विविध उपक्रम राबविण्यात आले. अध्यक्षस्थानी सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून विठ्ठल मंगेश पाटील, इंदास दाजी पाटील बागायतदार संघाचे चेअरमन प्रकाश इंदास पाटील, जय योगेश्वर किसान सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जगन्नाथ नारायण पाटील, किशोर पाटील, शहादा खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, तळोदा खरेदी-विक्री संघाचे चेअरमन गोविंद पाटील, कांतीलाल टाटिया, प्राचार्य मकरंद पाटील, रोहिदास पाटील, डॉ.लतेश पाटील, प्रशांत पाटील, डी.एच. पाटील, प्रा.ईश्वर चौधरी, प्रेमसिंग आहेर, श्रीपत पटेल आदी उपस्थित होते. दीपक पाटील यांच्या हस्ते ब्राrाणपुरी येथील सुसरी नदीपात्रात जलमंदिराच्या तर कै.नरोत्तम मंगेश पाटील फाउंडेशनच्या फलकाचे अनावरण अध्यक्षा शकुंतला नरोत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गोरगरीब व गरजू जनतेला मदत, शेतक:यांना मार्गदर्शन करण्यासाठी फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. याफाऊंडेशनतर्फे गुणवंत विध्याथ्र्याचा गौरव, परिसरातील जलमंदिरासाठी काम करणा:या नवानगर, बामखेडा, सुलवाडे, पिंपळोद आदी गावांतील ग्रामस्थांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.टाटीया म्हणाले की, सामान्य माणसाला उभे करण्याचे काम फाऊंडेशन करीत आहे. समाजाला चांगली दिशा देण्यासाठी ब्राrाणपुरी गाव चांगले काम करते. जिल्ह्याला दुष्काळापासून मुक्त करू शकतो ते काम केले पाहिजे. दीपक पाटील म्हणाले की, सुसरी नदीपात्रात लोकसहभागातून केलेले खड्डे पाणी अडविण्यासाठी फार उपयोगी ठरत आहे. जिल्हा कसा जलमय होईल यासाठी सर्वानी प्रय} केले पाहिजे.रक्तदान शिबिरात 80 दात्यांनी रक्तदान केले. शिबिरात महिलांनीही सहभाग नोंदवला होता. धुळे येथील नवजीवन ब्लड बँकेतर्फे रक्तसंकलन करण्यात आले. कार्यक्रमास प्रा.विश्वास पाटील, अंबालाल सुभाष पाटील, डॉ.अजित पाटील, प्रमोद मुरलीधर पाटील, उपसरपंच अंबालाल पाटील, राजेंद्र पाटील, जगदीश पाटील, रमाकांत पाटील, योगेश पाटील, सुनील पाटील उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विजय पाटील, सुनील पाटील, अनिल पाटील, संजय पाटील, अंशुमन पाटील, अमोल पाटील, राधाकृष्ण परिवार व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक विजय विट्ठल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक जी.आर. पाटील यांनी तर आभार सुनील नरोत्तम पाटील यांनी मानले.
सुसरी नदीपात्रात जलमंदिराचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 6:25 PM