ऑनलाईन लोकमतमोदलपाडा, दि़22 : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे ग्रामपंचायतीकडून पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी तीन कुपनलिकांचे काम करण्यात आले आह़े त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़ेखापर हे अक्कलकुवा तालुक्यातील मोठे व महत्वाचे गाव आह़े उन्हाळ्यात ब:याच वेळा पाण्याची पातळी खालावत असल्याने पाणीटंचाई निर्माण होत असत़े परिणामी महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. खापर गावातील वाडीले नगर, स्मशानभूमीकडे जाणा:या रस्त्यालगत व आमलीफळी येथे कुपनलिकांच्या कामाचे उद्धाटन खापरच्या सरपंच करूणाबाई वसावे, भाजपाचे जिल्हा चिटणीस व खापरचे उपसरपंच विनोद कामे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प.स. सदस्या कविता कामे, दिपक पाडवी, अविनाश पाडवी, राजाराम वसावे, दक्षा वसावे, विद्या कापूरे, निर्मल पाडवी, रंजिता वसावे, मोनिका भोई, रोशनबी पिंजारी, रोहित लोहार, सुनील सूर्यवंशी, विजय कामे, सुरज पाडवी, गणेश कुंभार, भूषण कामे, देविदास वसावे, प्रियंका अग्रवाल आदी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उद्धाटनप्रसंगी उपस्थित होते. या ग्रामपंचायतीला अलिकडेच स्मार्ट ग्रामचाही पुरस्कार प्राप्त झाला आहे.
खापर येथे तीन कुपनलिकांचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:24 PM