ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.25 - सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या रोपे आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत नंदुरबार शहरातील नागरिकांना सवलतीच्या दरात वृक्ष पुरवठा करण्यासाठी वनमहोत्सव केंद्राचे उद्घाटन आमदार डॉ़ विजयकुमार गावीत व जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याहस्ते करण्यात आल़े
सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक एस़आऱमोरे, सहायक संचालक रामकिसन जेजुरकर, सहायक वनसंरक्षक रणदिवे, लागवड अधिकारी मनोज रघुवंशी उपस्थित होत़े प्रारंभी शहरातून जनजागृतीपर वृक्षदिंडी काढण्यात आली होती़ दिंडीत आमदार डॉ़गावीत व जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांनीही सहभाग घेत, जनजागृती केली़