शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

अनावश्यक बॅरीकेटिंगमुळे गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 8:22 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरात कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर प्रशासनाच्यावतीने कन्टेनमेंट झोन आणि बफर झोन सील करण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरात कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर प्रशासनाच्यावतीने कन्टेनमेंट झोन आणि बफर झोन सील करण्यात आले आहेत. अनेक वसाहतींमध्ये नागरिकांनी नियमबाह्यरित्या रस्ते वाहतुकीसाठी बंद केले असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने नागरिकांनी नियमबाह्यरित्या बंद केलेले रस्ते व अडथळे वाहतुकीसाठी खुले करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे व पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे.शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये कोरणा विषाणू संक्रमित आई व तिचा मुलगा निष्पन्न झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असले तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण भागात आणि शहरी भागात दोन्ही ठिकाणी बाहेरच्या माणसाला बंदी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात ग्रामसुरक्षा दल व पदाधिकारी हे गावाच्या सर्व सीमांवर तैनात झाले आहेत. यामुळेदेखील ग्रामीण भागात अडकलेल्या वृद्धांच्या आणि रुग्णांच्या औषधोपचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर शहरी भागात अनेक ठिकाणी वसाहतीतील रस्ते रहिवाशांनी अनाधिकाराने बंद केले आहेत. याचा परिणाम म्हणून शहरी भागात गेले दोन दिवस दूध आणि इंधन, गॅससह जीवनावश्यक वस्तू पुरवणाऱ्या दुकानदारांना आणि व्यावसायिकांना अडचण निर्माण झाली आहे.यासंदर्भात कुलकर्णी रुग्णालयाच्या डॉ.मालविका कुलकर्णी यांनी एका व्हिडिओद्वारे प्रशासनापर्यंत आपली तक्रार पोहोचवलेली आहे. गुरुवारी स्थानिक प्रशासनाला याच पद्धतीने एका गरोदर मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले. यामुळे प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, पालिका मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ यांनी नगरसेवकांच्या माध्यमातून शहरवासीयांना आवाहन केले आहे. ग्रामीण भागातील वृद्ध आणि रुग्ण यांच्या औषध उपचारांमध्ये सहकार्य करण्यासाठी योग्य ती व्यवस्था निर्माण करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तर शहरी भागात नगरसेवकांनी नको त्या ठिकाणी असलेली नियमबाह्य बॅरीकेटिंग दूर करून नागरिकांना सहकार्य करण्यासाठी त्यांचे प्रबोधन करावे अन्यथा पालिकेमार्फत हे अडथळे दूर करण्यासाठी अनावश्यक शक्ती, वेळ व मनुष्यबळ खर्च करावे लागणार आहे. कोरोनाविरुद्धचे युद्ध आपणा सर्वांना जिंकण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावे, असेही आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.