लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात गत 25 दिवसात हजेरी लावणा:या 190 मिलीमीटर पावसाच्या बळावर 57 टक्के क्षेत्रात खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ दरदिवशी बसरणा:या सरींमुळे उकाडय़ापासून दिलासा मिळाला असला तरी लघु आणि मध्यप्रकल्पात केवळ 25 टक्के जलसाठा असल्याने जिल्हावासियांच्या अडचणी अद्यापही दूर झालेल्या नाहीत़ यंदाच्या पावसाळ्यात मुसळधार पाऊस हजेरी लावून दुष्काळातून सुटका होणार अशी अपेक्षा ठेवत शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होत़े परंतू जून मध्यानंतर पावसाला सुरुवात होण्यापूर्वी जिल्ह्यात काही ठिकाणी शेतक:यांनी धूळ पेरणी करत धोका पत्करला होता़ गत आठवडय़ातील पावसामुळे शेतक:यांनी पत्करलेल्या या धोक्याला यश आले असले तरी पावसाने अद्यापही अपेक्षित वेग धरलेला नसल्याने चिंता कायम आह़े दुसरीकडे शेतशिवारात मात्र पेरण्यांसह इतर शेतीकामे उरकून घेण्यावर शेतकरी भर देत आहेत़ यातून गेल्या 10 दिवसात 1 लाख 10 हजार हेक्टर क्षेत्रात कापूस, मका, खरीप ज्वारी, बाजरी, भातासह विविध पिकांच्या पेरणीला वेग आला आह़े सोयाबीन लागवडीला जमिनीच्या ओलचा फटका बसत आह़े जिल्ह्यात आतार्पयत सरासरी 190 मिलीमीटर पावसाची नोंद असून आतार्पयत सर्वाधिक 291 मिलीमीटर पाऊस तळोदा तालुक्यात कोसळला आह़े त्याखालोखाल नंदुरबार 128, नवापुर 88, शहादा 181, अक्कलकुवा 203 तर धडगाव तालुक्यात 247 मिलीमीटर पावसाची नोंद आह़े
जिल्ह्यात यंदा 2 लाख 77 हजार 821 हेक्टर क्षेत्रात खरीप पेरणी होण्याचे निर्धारित केले गेले आह़े अद्याप जिल्ह्यात 1 लाख 60 हजार 905 हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ नंदुरबार तालुक्यात 64 हजार 44 हेक्टरपैकी 40 हजार 258 हेक्टरवर पीकपेरा पूर्ण झाला आह़े तालुक्यात 62 टक्के क्षेत्रात पेरणी झाली आह़े नवापुर तालुक्यात 58 हजार 863 हेक्टरपैकी 32 हजार 46 हेक्टर क्षेत्रात 54 टक्के पिकपेरा झाला आह़े शहादा तालुक्यात निर्धारित 64 हजार 28 पैकी 28 हजार 56 हेक्टी क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत़ जिल्ह्यात सर्वाधिक कमी 43 टक्के पेरणी येथे झाली आह़े तळोदा तालुक्यात अद्याप 57 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आह़े तालुक्यात सर्वसाधारण 21 हजार 652 हेक्टरवर पीकपेरा निर्धारित होता़ त्यापैकी 12 हजार 459 हेक्टरवर पिकांची पेरणी झाली आह़े अक्कलकुवा तालुक्यात 31 हजार 926 हेक्टरवर तर धडगाव तालुक्यात 16 हजार 16 हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आह़े
पावसाच्या अल्प हजेरीमुळे जिल्ह्यातील प्रकल्पात जलसाठय़ा वाढ झालेली नाही़ रंगावली प्रकल्पात आजअखेरीस 0़65 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आह़े त्याची टक्केवारी ही केवळ 5 टक्के आह़े सारंगखेडा बॅरेजमध्ये 27़96 तर प्रकाशा बॅरेजमध्ये 25़31 दशलक्ष घनमीटर जलसाठा आह़े दोघा बॅरेजचे दोन दरवाजे अध्र्या मीटरने वर उचलले गेल्याने पाण्याचा विसर्ग सुरु आह़े शिवण प्रकल्पात आजअखेरीस 2़58 दशलक्ष घनमीटर जलसाठा आह़े त्याची टक्केवारी 12़49 टक्के आह़े दरा प्रकल्पात 8़75 दशलक्ष घनमीटर जलसाठा आह़े राणीपूर प्रकल्पात 19 टक्के र उर्वरित 37 मध्यम प्रकल्पात 8 दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक आह़े लघु आणि मध्यम प्रकल्पात 25़47 टक्के जलसाठा असून गेल्यावर्षी याच दिवशी 29़92 टक्के जलसाठा होता़