शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

नवापुरात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:14 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील ३२ व ५८ वर्षीय दोन जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, ६७ वर्षीय कोरोना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरातील ३२ व ५८ वर्षीय दोन जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, ६७ वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह इसमाच्या मुलाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह संख्येत वाढ होत आहे. कोरोना मुक्तीसाठी लोकप्रतिनिधी सरसावले असून, मालेगाव पॅटर्नवर आधारीत काढ्याचे वाटप शहरात सुरू करण्यात आले आहे.शहरातील शीतल सोसायटीत राहणाऱ्या ६७ वर्षीय वृध्द व मुसलमान मोहोल्ल्यातील २८ वर्षीय महिला मंगळवारी कोरोना पॉझिटीव्ह झाल्याचे स्पष्ट झाले होते. शीतल सोसायटीमधीलच ३२ वर्षीय इसमास कोरोना सदृष्य लक्षणे दिसून आल्याने त्यास जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आला असून, असाच निगेटिव्ह अहवाल आदर्श नगरातील ५८ वर्षीय इसमाचा आल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली. या अहवालामुळे शहरास दिलासा मिळाला आहे. दरम्यान शीतल सोसायटीत राहणाºया ६७ वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह वृध्देच्या मुलासही कोरोनाची संशयित लागण झाल्याची माहिती असून, पिता-पुत्रावर सुरत येथे उपचार सुरू आहेत.नवापूर शहर लॉकडाऊन काळात कोरोनापासून मुक्त होते. एकही रूग्ण पॉझिटीव्ह आढळून न आल्याने तालुका ग्रीन झोनमध्ये होता. प्रत्येक नागरिक आमचा नवापूर कोरोना मुक्त असल्याचे अभिमानाने सांगत होता. अनलॉकच्या दुसºया टप्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला आणि हळू हळू कोरोना पाय पसरवित असल्याने रूग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंता जनक होत चालली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव यापुढे वाढू नये यासाठी तालुका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. लोकप्रतिनिधींची जोड त्यांना आहेच. भरीस भर म्हणून मालेगाव पॅटर्नवर आधारित काढ्याचे वाटप सुरू करुन लोकप्रतिनिधींनी शहरास कोरोनाच्या विळख्यातुन सुटकेसाठी पावले उचलली आहेत. आमदार शिरीष नाईक, नगराध्यक्षा हेमलता पाटील, उपनगराध्यक्ष आरीफ बलेसरिया यांनी नियोजन करून वॉर्ड टु वॉर्ड व होम टु होम या काढ्याचे वाटप सुरू केले आहे. नगरसेवक अय्युब बलेसरिया यांनी आपल्या कार्यालयात उपलब्ध करून दिलेला काढा सर्वांसाठी खुला ठेवला आहे तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावीत यांनीही होम टु होम वाटपासह आपल्या कार्यालयात हा काढा वितरणासाठी उपलब्ध करून ठेवला आहे.दरम्यान महात्मा गांधी पुतळ्याच्या जवळची दुकाने कंटेनमेंट झोनमुळे बंद ठेवण्यात आल्याने तेथील बॅरिकेटींग काढण्यासाठी बुधवारी प्रयत्न झाला. व्यावसायीकांनी पालिकेत जावून या दिशेने प्रयत्न केलेत. कंटेनमेंट झोनमध्ये शासनाकडून पुरविण्याच्या सोयींबद्दल काहीच हालचाल नसल्याने नागरिक आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी बॅरकेटींग ओलांडून ये जा करताना दिसून आले. या गरजा शासनाकडून पूर्ण करणे अभिप्रेत असताना नागरिकाना प्रतिक्षा व प्रयत्न करावे लागत असल्याचे चित्र आहे. नोकरी करणारे व व्यापारी यांना नियमित तपासणी करून पासेसद्वारे ये-जा करण्याची मुभा दिली जात असताना कुणासही अश्या पासेस न दिले गेल्याने असला काही प्रकारच नसल्याची स्थिती आहे.