नंदुरबार : पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मासानिमित्त नंदुरबारात तांब्याच्या भांडय़ांमध्ये मोठी उलाढाल होत आह़े अधिक महिन्यात जवाई, भाचा, ब्राrाण आदींना तांब्याची भांडी वाण म्हणून देणे शुभ मानले जात असल्याने बाजारपेठेत तांब्याच्या भाडय़ांची मोठी विक्री होत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आल़ेपौराणिक काळापासून अधिक महिन्याचे महत्व असून या दरम्यान, तांब्याच्या भांडय़ांचे दान केले जात असत़े चांद्रमास व सौरमास यांच्यात समन्वय घालण्यासाठी अधिक महिना निर्माण होत असतो़ या अधिक मासाला मलमास असेही म्हटले जात़े त्यामुळे या महिन्यात कुठलेही शुभ कार्य करणे टाळले जात असत़े अधिक मासात तांब्याचे महत्वमानवास प्रथम तांबं या धातुचा शोध लागला़ तसेच तांब्यात पाण्याव्यतिरिक्त काहीही ठेवल्यास ते त्यात नासत असते तर, पाणी ठेवल्यास ते शुध्द होत़े त्यामुळे तांब या धातूचा वापर पूर्णपणे पाण्यासाठी केला जातो़ किंबहुणा तांब्याच्या भांडय़ात ठेवलेले पाणी हे शुध्दसुध्दा होत असत़े त्यामुळे पहिली शोध लागलेली वस्तू देवाला अर्पण करण्याच्या हेतुने पौराणिक काळापासून तांब हे देवाची पुजाअर्चा करण्यासाठी वापरले जात असत़ेदरम्यान, अधिक महिन्यात जवाई, भाचा, ब्राहम्ण यांना तांब्याची भांडी देण्याला अधिक महत्व असत़े त्यासोबतच तांब्याच्या भांडयांमध्ये अनारसे, बत्तासे आदी छिद्रेयुक्त पदार्थ दिले जातात़ हे पदार्थ दिल्याने त्यांच्यातील छिद्रयातून आपले पाप गाळून निघते असल्याचे दाखले दिले जातात़गंगावनाला मागणी वाढलीअधिक महिन्यात कुठलीही तांब्याची भांडी दिली तरी चालतात़ परंतु तांब्याच्या गंगावनाला सर्वाधिक मागणी असत़े त्योबत इतरही वस्तूंना मागणी वाढली आह़े
तांब्याच्या भांडय़ांना वाढली मागणी : अधिक मास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 1:09 PM