नंदुरबार : जिल्ह्याभरात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातारण असल्याने, शहरासह गावामध्ये डासांची झपाट्याने वाढ होत असल्याने आजार वाढण्याची भीती आहे. डासावर प्रतिबंधक उपाययोजना म्हणून धुके फवारणी करणे, डबकीच्या ठिकाणी पावडर टाकण्याची गरज असून, आरोग्य विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिकांडून होत आहे.
रेल्वे स्थानकात बॅाम्ब तपासणी मॅाक ड्रील
नंदुरबार: शहरातील रेल्वे स्थानकात आपात्कालीन स्थिती हाताळण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून बॉम्बशोधक पथकांची मॅाक ड्रील घेण्यात आली. मॅाक ड्रीलमध्ये बॅाम्बशोधक साहित्य व श्वानचा उपयोग करण्यात आला, तसेच रेल्वे गाडी आल्यानंतर गाडी व स्थानकाची झाडाझडती घेण्यात आली.
बेशिस्त पार्किंगवर कार्यवाही मागणी
नंदुरबार: शहरातील रस्त्यावर वाहनधारक बेशिस्तपणे दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने पार्किंग करत आहे. त्यामुळे वाहनाचा खोळंबा निर्माण होत असल्याने, वाहनाच्या लांब रांगा लागत असल्याने, वाहनधारकांसह स्थानिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बेशिस्त वाहनधारकांवर पोलीस प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.