प्रतापपूर : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर सह परिसरात कृषी विभाग व कृषी महाविद्यालयाच्या पथकाने भेट देत पाहणी केली़ यादरम्यान त्यांना कापसावर बोंडअळी आणि मिलीबग यांचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून आल़े प्रसंगी पथकाने शेतक:यांना मार्गदर्शन करत उपाययोजनांची माहिती दिली़ तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे कृषी अधिकारी व कृषी महाविद्यालय यांच्यावतीने मासिक चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत़े प्रसंगी धुळे कृषी महाविद्यालयाचे डॉ़ मुरलीधर महाजन, कीडरोग तज्ञ डॉ़ भालचंद्र म्हस्के, प्रा़ श्रीधर देसले, कृषी अधिकारी व्ही़व्ही़जोशी, उपविभागीय कृषी अधिकारी संदीप वळवी, तालुका कृषी अधिकारी बी़ज़े गावीत, कृषी पर्यवेक्षक जी़आऱपाटील, कृषी सहायक पी़आऱदळवी यांच्यासह जिल्ह्यातील कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होत़े यादरम्यान शेतक:यांनी शेतशिवारात बोंडअळी व मिलीबग यांचा प्रादुर्भाव असल्याची माहिती दिली़ पथकाने शेतशिवारात तातडीने भेटी देत कापूस पिकाची पाहणी केली़ डोमकळीत बोंडअळी आणि मिलीबग असल्याचे दिसून आल़े प्रतापपूर, तळोदा, बुधावली, काकलपूर, मोदलपाडा परिसरात कापसावर कीडरोग असल्याचे पथकाच्या निदर्शनास आल़े प्रतापपूर येथील पद्मसिंग राजपूत, निसार मक्राणी, रविंद्र जगन्नाथ चव्हाण यांच्या शेतात पथकाने भेटी देत माहिती जाणून घेतली़ यात ठिकठिकाणी गुलाबी बोंडअळी आणि मिलीबग दिसून आला़ काकलपूर येथील शेतकरी सिलू कोठा पाडवी यांच्या शेतातही बोंडअळी आढळून आली होती़ गेल्यावर्षी जिल्ह्यातल ब:याच शेतक:यांना बोंडअळीचा फटका बसला होता़ यंदा अशा प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने विविध उपक्रम सुरू केले आहेत़ याअंतर्गत तालुक्यात कामगंध सापळा वाटप आणि सापळा लावण्याची प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आल़े मोहिमेंतर्गत डॉ़ मुरलीधर महाजन व डॉ़ भालचंद्र म्हस्के यांनी शेतक:यांना गुलाबीबोंडअळी नियंत्रणासाठी गुलाबी बोंडअळीच्या डोमकळ्या नष्ट करणे, निंबोळी अर्क व रासायनिक किटकनाशकाची फवारणी कशी करावी याची माहिती दिली़ मिलीबगच्या नियंत्रणासाठी शेतक:यांनी कृषी करावयाच्या उपाययोजनांची माहितीही त्यांनी दिली़ यावेळी कृषी अधिका:यांनी शेतक:यांना कीड व्यवस्थापन, खत व्यवस्थापन याबाबत माहिती देत बांधावर शेतक:यांसोबत चर्चा केली़ तळोदा तालुक्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत़ सापळे लावण्याबाबत शेतक:यांना योग्य मार्गदर्शन करण्याची अपेक्षा व्यक्त होत आह़े तळोदा तालुक्यात यंदा 8 हजार 420 हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड झाली आह़े सर्वसाधारण 8 हजार 200 हेक्टर लागवडीचा अंदाज असताना 101 टक्के कापूस लागवड झाली आह़े सुरूवातीच्या काळात पाऊस चांगला झाल्याने शेतक:यांमध्ये उत्साह होता़ त्यातून लागवड क्षेत्र 100 हेक्टरने वाढले होत़े
बोंडअळी व मिलीबगमुळे वाढली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 1:51 PM