लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 19 : मणिबेली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात चक्क एका साधुबाबाने आपला संसार थाटला असल्याची बाब उघड झाली आह़े या ठिकाणी निवासी कर्मचा:यांसाठी बांधण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या एका खोलीत हा साधुबाबा वास्तव्यास होता़ तळोद्यातील मणिबेली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अधिका:यांना ही बाब समोर आल्यावर धक्काच बसला़ त्यामुळे नर्मदा काठावरील आरोग्य यंत्रणेकडून किती ढिसाळ कारभार होत आहे, हे या घटनेवरुन अजून एकदा अधोरेखीत झाल़े जिल्हा परिषदेचे जिल्हा साथरोग आरोग्य अधिकारी डॉ़ नारायण लक्ष्मण बावा व नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकत्र्यानी नर्मदा काठावरील कंजाला, मांडवा, डनेल व चिमलखेडी या प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्राना भेट दिल्यानंतर या पथकाने रविवारी अक्कलकुवा तालुक्यातील नर्मादाकाठावरील मनिबेली या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास भेट दिली़ तथापि या उपकेंद्रात एका साधुने आपला संसार थाटल्याचे उपस्थित अधिका:यांना दिसून आल़े हा प्रकार पाहिल्यानंतर चौकशी अधिकारी व कार्यकत्र्यानाही मोठा धक्का बसला़ संबंधित साधुची या ठिकाणी होमहवनचे साहित्येही दिसून आलीत़ शिवाय तेथे गॅसजोडणीही करण्यात आलेली होती़ सदर साधू गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी राहत असल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात आल़े परंतु तोर्पयत आरोग्य विभागाला याची माहिती नव्हती काय? असा प्रश्न यातून उपस्थित होत आह़े याबाबत चौकशी अधिकारी डॉ़ बावा यांनी उपस्थित असलेल्या आरोग्य कर्मचा:यांना या प्रकाराची विचारणा केली़ ग्रामस्थांच्या संमतीने नवरात्रोत्सवासाठी संबंधित साधूला राहण्यासाठी परवानगी देण्यात आल्याची उत्तरे या वेळी देण्यात आली़ त्यावेळी डॉ़ बावा यांनी संबंधित आरोग्य कर्मचा:यांना चांगलेच खडसावल़े आरोग्य कर्मचारीच या ठिकाणी राहत नसल्याने ही संधी साधत संबंधित साधू या ठिकाणी राहत असल्याचे सांगण्यात आल़े त्याच बरोबर आरोग्य केंद्रात पुरेशा औषधीदेखील आढळून आल्या नसल्याने कर्मचा:यांची झाडाझडती करण्यात आली़ येथील आदिवासी बांधवांना आरोग्याच्या सेवा सुविधांपासून वंचित रहावे लागत असत़े याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ठोस कार्यवाही करण्याची अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली़
कर्मचा-यांऐवजी साधुने मांडला संसार : मणिबेली आरोग्य उपकेंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:17 PM